Narendra Modi, Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Narendra Modi Vs Priyanka Gandhi : मोदींविरोधात प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात असत्या तर..!

Lok Sabha Election 2024 Result Varanasi Constituency Narendra Modi : वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली होती.

Rajanand More

Varanasi Constituency : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथही घेतली. मंत्र्यांचे खातेवाटप झाले अन् बहुतेक जण कामालाही लागले. पण वाराणसी मतदारसंघात मोदींच्या कमी झालेल्या मतांच्या लीडची चर्चा अजूनही झडत आहे.

काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये लीड घेत सर्वांनाच धक्का दिला. पण नंतर हे लीड वाढत गेले आणि अखेर मोदींनी सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला.

मागील निवडणुकीच्या तुलनेत मोदींचे मताधिक्य काही लाखांनी कमी झाल्याने पराभव होऊनही काँग्रेसला हायसे वाटले. नरेंद्र मोदींना 6 लाख 12 हजार मते मिळाली आहेत. अजय राय यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.

नरेंद्र मोदींविरोधात राय यांच्याऐवजी प्रियांका गांधी असत्या तर निकाल काही वेगळा लागला असता, अशी चर्चा आता काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. खुद्द राहुल गांधींनीच त्यावर भाष्य केले आहे. मंगळवारी रायबरेलीमध्ये बोलताना त्यांनी हे बोलून दाखवले. वाराणसीतून प्रियांकाने निवडणूक लढवली असती तर मोदींचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव झाला असता, असे विधान राहुल यांनी केले आहे.

अहंकारातून हे बोलत नाही. देशातील जनतेने पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे की, ते त्यांच्या राजकारणावर खूष नाहीत. केवळ आणि केवळ द्वेष भावनेतून त्यांनी निवडणूक लढवली. आता देशातील जनता द्वेष आणि हिंसेविरोधात उभी ठाकली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

राहुल यांच्या या भूमिकेवर अजय राय यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आम्हीही प्रियांका गांधीचे नावे सुचवले होते. त्यांनी निवडणूक लढवली असती तर ही निवडणूक रंगतदार झाली असती, असे राय यांनी म्हटले आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा दणका बसला आहे. तर इंडिया आघाडीने मुसंडी मारली.

एकूण 80 जागांपैकी समाजवादी पक्षाला 37 तर भाजपला 33 जागा मिळाल्या आहेत. उत्तर प्रदेशात राहुल यांच्यासह काँग्रेसचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीची जणू लाट आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळेच राहुल गांधी यांनी वाराणसीबाबत हे विधान केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT