Chandrababu Naidu Oath Ceremony : कडकडून मिठी अन्..! मोदी आणि नायडूंच्या मैत्रीचे ते 20 सेकंद…

Andhra Pradesh Government PM Narendra Modi Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेतली.
Narendra Modi, Chandrababu Naidu
Narendra Modi, Chandrababu NaiduSarkarnama

Andhra Pradesh New CM : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. शपधविधी सोहळ्यामध्ये मोदी आणि नायडू यांच्यातील मैत्रीची झलक पाहायला मिळाली.

शपथ घेतल्यानंतर नायडू थेट पंतप्रधान मोदींच्या दिशेने गेले. त्याआधी मोदींनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हसतहसत पुष्पगुच्छही दिले. तेवढ्यात नायडू मोदींच्या पाया पडण्यासाठी झुकत असताना मोदींना त्यांना थांबवले अन् कडकडून मिठी मारली.

दोघांच्या उत्साहामुळे व्यासपीठासह शपथविधीला उपस्थितांनीही त्यांचे जोरदार स्वागत केले. दोघांनी जवळपास 20 सेकंद एकमेकांची गळाभेट घेतली. त्यामुळे दोघांमधील मैत्रीची प्रचिती यावेळी आली. शपथविधी आधीही दोघांमध्ये सतत चर्चा सुरू होती. त्यामुळे या मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Narendra Modi, Chandrababu Naidu
Chandrababu Naidu : चंद्राबाबूंचा जगनमोहन यांना शपथविधीआधीच पहिला झटका; राजधानीबाबत मोठी घोषणा

मागील पाच दिवसांत दुसऱ्यांदा नायडू आणि मोदींना एकमेकांशेजारी बसण्याची संधी मिळाली. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन देताना नायडूंनी त्यांची खूप प्रशंसा केली होती. मोदींनी सर्वात जूने सहकारी म्हणून त्यांचा सन्मान केला होता.

दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांच्यासह 25 मंत्र्यांचाही बुधवारी शपथविधी झाला. जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण हे नायडू सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील. नायडू यांचे पुत्र नारा लोकेश यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिंमडळात 17 जण पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात एनडीएने माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची सत्ता उलथवून टाकली आहे. टीडीपीला 175 पैकी तब्बल 135 जागांवर विजय मिळाला आहे. तर पवन कल्याण यांना २१ आणि भाजपला आठ जागा मिळाल्या आहेत. रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला केवळ 11 जागा मिळाल्या. त्याचप्रमाणे राज्यातील 25 लोकसभा जागांपैकी एनडीएला 11 जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com