Tejashwi Yadav, Nitish Kumar Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : तेजस्वी यादवांवर नितीश कुमारांच्या उमेदवारासाठी मतं मागण्याची वेळ

Tejashwi Yadav News : बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघात पप्पू यादव यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Rajanand More

Bihar News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपचा पराभव करण्यासाठी तयार झालेल्या इंडिया आघाडीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये बिघाडी झाल्याचे आता समोर येऊ लागेल आहे. बिहारमध्ये काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची झोप उडवली आहे. या बंडखोराला पराभूत करण्यासाठी लालूंचे पुत्र तेजस्वी यादव हे चक्क मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मतं देण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे बिहारच्या राजकारणात यादवांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.   

बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघात तेजस्वी यांना असे आवाहन करावे लागत आहे. बिहारमध्ये काँग्रेस (Congress) आणि आरजेडीमध्ये जागावाटप झाले आहे. त्यानुसार पूर्णिया मतदारसंघ आरजेडीच्या वाट्याला आला आहे. तिथे बीमा भारती (Bima Bharti) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दाखल झालेले पप्पू यादव (Pappu yadav) या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पण हा मतदारसंघ आरजेडीला गेल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पप्पू यादव हे काही वर्षांपर्यंत आरजेडीमध्येच होते. पक्षातून बाहेर पडत त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. हा पक्ष त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये विलीन केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी मिळवण्यासाठी पप्पू यादव यांनी बरेच प्रयत्न केले. पण अखेर त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. यादवांनीही त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आपला उमेदवार पडला तरी चालेल पण पप्पू यादव पराभूत व्हायला हवेत, अशीच चर्चा आरजेडीमध्ये सुरू असल्याचे दिसते. कारण तेजस्वी यादव यांनी पूर्णियामध्ये झालेल्या प्रचार सभेत एनडीएच्या (NDA) उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) म्हणाले, ‘इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदार करा, पण जर आघाडीच्या बीमा भारती यांना मतदान करायचे नसेल तर मग एनडीए निवडा.’ संयुक्त जनता दलाचे नेते संतोष कुशवाहा एनडीएचे उमेदवार आहेत. ते विद्यमान खासदार असून तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत, तर पप्पू यादव हेही या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यामुळे तिरंगी लढत होत असून, पप्पू यादव यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेजस्वी यांच्यावर एनडीएच्या उमेदवारासाठी मतं मागण्याची वेळ आल्याची चर्चा आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT