New Delhi News : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election News) सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजप प्रयत्नशील असतानाच सुरतमधून ‘गुड न्यूज’ आली. भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे, पण आता काँग्रेसने ही निवडणूकच स्थगित करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
काँग्रेसकडून (Congress) आज निवडणूक आयोगाकडून एकूण 16 तक्रारी करण्यात आल्या. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल राजस्थानमध्ये केलेल्या काँग्रेसच्या जाहीरनामा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या विधानाची तक्रारही करण्यात आली आहे. तसेच सुरतमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केलेल्या काँग्रेस उमेदवाराच्या अर्जाबाबतही आयोगाकडे (Election Commission of India) तक्रार करण्यात आली आहे.
सुरतमध्ये काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला. त्यानंतर इतर आठ उमेदवारांनीही माघार घेतल्याने भाजपचे (BJP) उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) हे बिनविरोध विजयी झाले. देशातील भाजपचे ते निवडून आलेले पहिले खासदार ठरले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसकडून आज निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. तीन सूचकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुंभाणी यांच्या अर्जावर सह्याच केल्या नाहीत. त्याआधारे अर्ज बाद करण्यात आला आहे. पण त्या दिवसापासून हे तिघेही गायब असून, त्यांचे अपहरण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असतानाही त्यांनी कुंभाणी यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे सुरत मतदारसंघातील निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी आयोगाकडे केल्याची माहिती काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली.
दरम्यान, दलाल हे बिनिविरोध विजयी होणार पहिले खासदार नाहीत. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत 30 हून अधिक खासदार बिनविरोध संसदेत गेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan), जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, डिंपल यादव यांचाही समावेश आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.