Shibu Soren, Sita Soren Sarkarnama
देश

Sita Soren News : झारखंडमध्ये राजकीय भूकंप; सोरेन यांच्या सूनबाईंची पक्षाला सोडचिठ्ठी, आमदारकीही सोडली

Shibu Soren News : सीता सोरेन या शिबू सोरेन यांच्या सून आहेत. मंत्रिमंडळासह पक्षात डावलले जात असल्याबाबत त्यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Rajanand More

Jharkhand News : झारखंडमधील राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर आलेले संकट कसेबसे दूर झाले. आता झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सून आमदार सीता सोरेन (Sita Soren News) यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याने आता सोरेन कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे.

सीता सोरेन या भाजपमध्ये (BJP) दाखल होण्याची शक्यता असून, आगामी लोकसभा निवडणूकही लढवू शकतात. त्या आतापर्यंत तीनदा आमदार झाल्या आहेत. त्यांनी शिबू सोरेन (Shibu Soren) यांना पत्र लिहून पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे म्हटले आहे. पतीच्या निधनानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला सातत्याने डावलले गेले. पक्षात आणि कुटुंबात दुजाभाव करण्यात आला. हे आमच्यासाठी वेदनादायी होते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्याविरोधात षडयंत्र रचले होते. त्यामुळे मी जेएमएम कुटुंबाला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सोरेन यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी झारखंड विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे झारखंडमध्ये (Jharkhand) पुन्हा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अटक झाल्यानंतरही सीता सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. त्यावेळी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण चंपई सोरेन यांना या खुर्चीवर बसवण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच कल्पना सोरेन यांना पक्षाच्या व्यासपीठावर महत्त्वाचे स्थान देण्यात आले.

मुंबईत झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला चंपई सोरेन यांच्यासोबत कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. त्यांनी जोरदार भाषण करत त्याच पक्षाच्या नेत्या असतील, असे सूचक संकेतही दिले होते. त्यानंतर दोन दिवसांतच सीता सोरेन यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सोरेन कुटुंबामध्ये राजकीय वादामुळे फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT