Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून भडकलेल्या केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

Pashupati Paras : भाजपने जागावाटपात चिराग पासवान यांना झुकते माप दिल्याने पारस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ते एनडीएतून बाहेर पडू शकतात.
Pashupati Paras
Pashupati ParasSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर भाजपला बिहारमध्ये मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी आज तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. कालच भाजपने बिहारमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यामध्ये चिराग पासवान यांना पाच जागा देण्यात आल्या आहेत, तर पारस यांच्या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पारस यांनी थेट केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

बिहारमध्ये (Bihar) लोकसभेच्या 40 जागा असून, त्यापैकी 17 जागा भाजपला, 16 जागा जेडीयूला आणि पाच जागा चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) मिळाल्या आहेत, तर एनडीएतील (NDA) हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

Pashupati Paras
Raj Thackeray News : मोदी-शाहांना हाकलून देण्याची भाषा करणारे राज ठाकरे शाहांच्या घराची पायरी चढणार?

पशुपती पारस (Pashupati Paras) यांच्या पक्षाचा समावेश जागावाटपात करण्यात आलेला नाही. रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. पारस यांच्याकडे मूळ पक्ष आणि पाच खासदार गेले. पण आता जागावाटपात त्यांना एकही जागा सोडण्यात आलेली नाही. पाच खासदार असूनही एकही जागा न मिळाल्याने पारस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीनामा दिल्यानंतर पारस म्हणाले, ‘आमच्या पक्षाचे पाच खासदार आहेत. मी प्रामाणिकपणे काम करत आहे. पण तरीही आमच्या पक्षावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.’ दरम्यान, पारस यांनी यापूर्वीच हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ही जागा चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या पक्षाला मिळाली आहे.

हाजीपूर हा रामविलास पासवान यांचा बालेकिल्ला मानला जातो. आता या मतदारसंघात काका-पुतण्यात आमने-सामने उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता ते एनडीएतूनही बाहेर पडून त्यांची डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  

R

Pashupati Paras
Lok Sabha Election 2024 : कर्नाटकात भाजपला धक्का? माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com