Danish Ali, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : विद्यमान खासदार काँग्रेसच्या वाटेवर; निवडणुकीआधी पक्षासाठी पहिली खूषखबर

MP Danish Ali News : दानिश अली हे बसपाचे उत्तर प्रदेशातील खासदार आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणास्तव त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडत असताना पक्षासाठी पहिली खूषखबर समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. आता काँग्रेसमध्ये एक विद्यमान खासदार प्रवेश करणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

बहुजन समाज पक्षाने (BSP) उत्तर प्रदेशात एकला चलोची भूमिका घेतल्यानंतर अनेक खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच समाजवादी पक्ष (SP) आणि काँग्रेसमधील (Congress) आघाडीची घोषणा झाल्यानंतर नेत्यांची चिंता अधिक वाढली आहे. खासदार दानिश अली यांच्या रूपाने बसपाला पहिला धक्का बसणार आहे. अमरोहाचे विद्यमान खासदार आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत.    

दानिश अली (Danish Ali) शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. एवढेच नाही तर ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी होण्याची शक्यता आहे. अली यांना बसपामधून काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत भाजपचे खासदार रमेश विधुडी आणि त्यांच्या वाद झाला होता. तेव्हापासून त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढल्याची चर्चा होती. राहुल गांधींनीही त्यांची भेट घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दानिश अली यांना काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीटही दिले जाईल, अशी चर्चा आहे. काँग्रेसला अमरोहाची जागा मिळाली आली. अली यांच्याप्रमाणेच जौनपूरचे बसपाचे खासदार श्याम सिंह यादवही बसपा सुप्रिमो मायावती यांना धक्का देऊ शकतात. तेही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत बसपा किंवा यादव यांच्याकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

अनेक नेते भाजपच्या संपर्कात

बसपाचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. खासदार संगीता आझाद यांनी पतीसोबत नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यांना भाजपकडून तिकीट मिळावे, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे खासदार मलूक नागर, रितेश पांड्येही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मायावती यांना निवडणुकीच्या तोंडावर धक्के बसू शकतात.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT