West Bengal News : विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या काही राज्यांमध्ये नेत्यांना सतत ‘ऑपरेशन लोटस’ची भीती सतावत असते. या रांगेत सध्या काँग्रेसची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश आणि झारखंडही आहे. त्यामध्ये आता पश्चिम बंगालचीही भर पडली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच तसा थेट इशारा दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला तृणमूल काँग्रेसपेक्षा एक जागा जास्त मिळाली तरी ममता बॅनर्जी यांचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
भाजप (BJP) बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. ते म्हणाले, राज्यातील लोकांना लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट आणि अराजकता पसरवणाऱ्या टीएमसीला हरवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये (West Bengal) 35 जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. यापेक्षा एक जरी जागा आम्हाला जास्त मिळाली तरी ममतांचे (CM Mamata Banerjee) सरकार कोसळेल, ते कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही.
ममतांचे सरकार कोसळण्यास आमचा पक्ष जबाबदार नसेल. टीएमपीची वंशवादाचे राजकारणच त्याला जबाबदार ठरेल. महाराष्ट्रात (Maharashtra Political News) शिवसेना-एनसीबी-काँग्रेस सरकार जाण्याला आम्ही कारण नव्हतो. उध्दव ठाकरेंना त्यांच्या मुलाविषयी आणि शरद पवारांना त्यांच्या मुलीविषयीचे प्रेम जबाबदार होते. हे वंशवादाचे राजकारण (Politics) होते, ज्यामुळे सत्ता गेली, असेही मुजुमदार यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
टीएमसीचे सचिव आणि ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याविषयी बोलताना मुजुमदार म्हणाले, बंगालमध्येही भाच्याविषयी त्यांचे प्रेमच त्यांचे सरकार जाण्याचे कारण ठरणार आहे. लायक नसलेल्या व्यक्तीला तुम्ही त्यापेक्षा अधिक दिले तर सगळेच बिघडून जाते, असे मुजुमदार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी भाजपकडे सध्या 74 आमदार असून त्यापैकी सात जण तृणमूलमध्ये गेले आहे. पण त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. तर टीएमसीकडे 217 आमदार आहेत. असे असले तरी नागरिकता संशोधन अधिनियम राज्यात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला फायदेशीर ठरणार असल्याचा दावाही मुजुमदार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.