Mamata Banerjee, Abhijit Gangopadhyay Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : आता कुठूनही लढा, मी तिथे..! भाजपवासी माजी न्यायाधीशांना ममतांचे आव्हान...

Mamata Banerjee News : ममता बॅनर्जी यांनी आज अभिजित गंगोपाध्याय यांच्यावर हल्ला चढवला. बीजेपी बाबूचा बुरखा फाटला असल्याचे त्या म्हणाल्या.

Rajanand More

West Bengal News : कलकत्ता हायकोर्टाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गंगोपाध्याय यांचा ‘बीजेपी बाबू’ असा उल्लेख करत आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कोणत्याही मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली तरी पराभूत करू, असे आव्हानही ममतांनी दिले. 

गंगोपाध्याय (Abhijit Gangopadyay) यांनी मंगळवारी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावर टीका करताना ममता म्हणाल्या, कोर्टाच्या खुर्चीवर बसलेल्या बीजेपी बाबूने आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा कशी करू शकता. त्यांचा बुरखा फाटला आहे.

ममता (Mamata Banerjee) सरकारच्या शिक्षक भरतीची चौकशी करण्याचे आदेश गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश असताना दिले होते. त्यावरून बरेच राजकारण तापले होते. आज त्याच मुद्द्याला हात घालत ममता म्हणाल्या, हजारो विद्यार्थ्यांना नोकरीपासून दर ठेवत आज ते नेते बनले आहेत. आता तयार राहा. तुम्ही कुठूनही निवडणूक (Election) लढवा, तिथे तुमच्याविरोधात लढण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठवणार आहे. आता लोक तुमचा न्याय करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारकडे पाच लाख नोकऱ्या आहेत. पण या धोकादायक सापाने बंगालमधील जनतेला नोकरी मिळू दिली नाही, असा हल्लाबोल ममतांनी केला. ममतांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या टीकेलाही उत्तर दिले. संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करत काल मोदींनी ममता सरकारवर निशाणा साधला होता.

बंगाल हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य असल्याचे सांगत ममता म्हणाल्या, बंगालमध्ये जवळपास 458 केंद्रीय पथके आली. पण मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात असताना तिथे किती पथके गेली? हाथरसमध्ये किती पथके गेली. तुमचा राग फक्त बंगालवरच आहे, अशी टीका ममतांनी केली. काहीवेळा काही गोष्टी माहिती होत नाहीत. पण अन्याय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्याला अटक करायलाही मागेपुढे पाहत नाही, असेही त्या म्हणाल्या.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT