Rahul Gandhi, Mamata Banerjee Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : हिंमत असेल तर 'या' मतदारसंघात भाजपला हरवून दाखवा! ममतांचं काँग्रेसला आव्हान...

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. बंगालमध्ये आघाडी करणार नसल्याचेही त्यांनी काही दिवसांपुर्वीच जाहीर केले आहे.

Rajanand More

West Bengal : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचलं आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेवरून त्यांनी यापुर्वीही हल्लाबोल केला होता. बंगालमध्ये आघाडी न करता तृणमूल काँग्रेस स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. आता त्यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. (Lok Sabha Election 2024)

बंगालमध्ये एका सभेत बोलताना ममतांनी काँग्रेसला (Congress) चाळीसही जागा मिळणार नाही, असे भाकित वर्तवले आहे. त्या म्हणाल्या, काँग्रेसला एवढा अहंकार कशाचा आहे, हे मला समजत नाही. काँग्रेसला 300 पैकी 40 जागांवरही विजय मिळणार नाही. आधी जिंकलेल्या जागांवरही ते पराभूत होत आहेत. त्यांच्यात एवढीच हिंमत असेल तर वाराणसीमध्ये भाजपला हरवून दाखवावे.

तुम्ही उत्तर प्रदेशात निवडणूक जिंकू शकला नाही. काँग्रेसला राजस्थानमध्ये जिंकता आले नाही. वाराणसी, अलाहाबाद या मतदारसंघातून त्यांनी जिंकून दाखवावे. बघुयात काँग्रेस पक्षात किती हिंमत आहे, असेही ममता (Mamata Banerjee) म्हणाल्या. आम्ही इंडिया आघाडीत असूनही भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये येणार असल्याचे सांगितले नाही. मला प्रशासनातून याविषयी माहिती मिळाल्याची नाराजाही त्यांनी पुन्हा बोलून दाखवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधींवर साधला निशाणा

मुर्शिदाबाद येथे राहुल गांधींनी विडी कामगारांसोबत फोटो काढले होते. त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावरून ममतांनी राहुल यांच्यावरही निशाणा साधला. आजकाळ फोटोशुटची चलती आहे. जे लोक कधी चहाच्या टपरीवर गेले नाहीत ते आता विडी कामगारांसोबत फोटो काढत आहेत, अशी टीका ममतांनी केली.

दरम्यान, ममतांनी काँग्रेसला लोकसभेसाठी केवळ दोन जागांची ऑफर दिली होती. आपण दिलेल्या सर्व ऑफर काँगेसने फेटाळल्याचे ममतांनी यापुर्वीच सांगितले होते. त्यामुळेच स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे ममतांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आपण अजूनही इंडिया आघाडीतच असल्याचे त्या सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संभ्रम वाढत चालला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT