Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आघाडीत घेत 16 उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. तर काँग्रेससोबतची जागावाटपाची बोलणीही अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे त्यांनी भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा केला आहे. (Lok Sabha Election 2024)
अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत एक खासदार वगळता भाजप सर्व विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याचा दावा केला आहे. अखिलेश यांनी ब्रेक्रिंग न्यूज म्हणत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील सर्व विद्यमान खासदारांचे भाजप (BJP) तिकीट कापणार आहे. केवळ एका खासदाराला वगळले जाणार आहे. ते खासदार मतदारसंघ बदलणार असून सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सध्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याच्या स्थितीत नाही. कारण विद्यमान खासदारांनी केवळ खिसे भरण्याशिवाय दुसरे कामच केलेले नाही. त्यामुळे जनतेत भाजप आणि भाजप खासदारांविरोधात राग आहे. परिणामी भाजपकडून नवीन उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. पण पराभूत व्हायला कुणीही निवडणूक लढायला तयार नाही. त्यामुळेच अद्याप एकाही उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही, असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या खासदारांनी कधीही आपल्या मतदारसंघाकडे डोकावूनही पाहिले नाही. त्यांनी परीक्षाच दिली नाही तर रिपोर्ट कार्ड कसे तयार होणार? भाजपने तिकीट कापण्याआधीच जनतेने त्यांच्या नावावर फुली मारली आहे. यावेळी त्यांच्या मतदारसंघात भाजपाच्या लोकांना प्रवेश मिळणार नाही. उत्तर प्रदेशातील जनता चांगले काम करणाऱ्यांनाच विजयी करेल, असा विश्वास अखिलेश यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.