Alka Lamba Congress leader Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी कधी जाहीर होणार? अलका लांबा यांनी सांगितला मुहूर्त

सरकारनामा ब्यूरो

सचिन देशपांडे-

Congress Candidate List For Lok Sabha 2024 Election :

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी आज राजस्थानमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत लोकसभा उमेदवारांची पहिली यादी कधी घोषित होणार, याची माहिती देत मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाहीत. त्यापूर्वीच काँग्रेस लोकसभा उमेदवारांची यादी घोषित करणार असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत जागावाटपासाठी इंडिया आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अशा स्थितीत महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उमेदवारांची यादी या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात Congress जाहीर करेल, असे घोषित केले. ज्या राज्यात केवळ काँग्रेस लढणार आहे. त्या राज्यातील उमेदवारांच्या याद्या घोषित करण्यात येतील, असे अलका लांबा यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे ज्या गोष्टींची घोषणा करू शकतात, ती घोषणा आज महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी केली. या महिन्याच्या अखेरीस काँग्रेस लोकसभा उमेदवारांची पहिली यादी घोषित करेल, असा गौप्यस्फोट अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत केला.

आता खरोखरच अलका लांबा यांच्या घोषणेप्रमाणे काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार का ?, हे पाहण्यासारखे ठरेल. एकीकडे देशात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची चर्चा असताना काँग्रेसने उमदेवारांची पहिली यादी घोषित करण्याची तयारी सुरू केल्याने लोकसभा निवडणुका कधी लागतात? याविषयी सर्वत्र साशंकता निर्माण झाली आहे.

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनानंतर लोकसभा निवडणूक लगेच घोषित होतील काय? अशी शक्यता अलका लांबा यांच्या आजच्या घोषणेवरून व्यक्त केली जात आहे. अलका लांबा यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या अधिकारात केलेला बदल आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त 'इंडिया' आघाडीच्या सदस्यांना भेटीसाठी वेळ देत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी यांची मणिपूर येथून 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पण राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेला मणिपूर येथून परवानगी मिळत नसल्याचा आरोप अलका लांबा यांनी केला. ही परवानगी मिळू नये, यासाठी थेट राज्यपाल, मुख्यमंत्री हे पोलिसांना टार्गेट करीत असल्याचा आरोप अलका लांबा यांनी केला.

भारत जोडो यात्रेत कुठेही राहुल गांधी यांनी मतांचा जोगवा मागितला नाही. त्याचबरोबर भारत न्याय यात्रादेखील राजकीय यात्रा नसल्याचे सांगत या यात्रेतही काँग्रेस मतांची मागणी करणार नाही. भारत जोडो न्याय यात्रा, यशस्वी होण्याची भीती केंद्र सरकारला आहे. ही यात्रा यशस्वी होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

भारत न्याय यात्रेत नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी होण्याची गरज नाही. 'मिस कॉल'च्या माध्यमातून नागरिक या न्याय यात्रेत सहभागी होऊ शकतात, असे आवाहन अलका लांबा यांनी केले.

edited by sachin fulpagare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT