Bharat Nyay Yatra : काँग्रेसच्या न्याय यात्रेला भाजपकडून पहिला धक्का

BJP : मणिपूर सरकारने परवानगी नाकारल्याचा काँग्रेसचा दावा...
Rahul Gandhi and Bharat jodo Yatra
Rahul Gandhi and Bharat jodo YatraSarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या भारत न्याय यात्रेला पहिला मोठा धक्का बसला आहे. यात्रेची सुरुवात 14 जानेवारीपासून मणिपूर राज्यातून होणार आहे. त्यासाठी आता केवळ चार दिवस उरले असले तरी अजून तेथील भाजप सरकारने यात्रेला हिरवा कंदील दाखवला नसल्याचे समोर आले आहे.

भारत न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी नियोजित आहे. 14 तारखेला काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यात्रेची सुरुवात करतील. संपूर्ण यात्रेदरम्यान पक्षाचे नेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशानंतर भारत न्याय यात्रा काढण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.

Rahul Gandhi and Bharat jodo Yatra
MLA Disqualification Result : निकालानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

काँग्रेसचे (Congress) नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, आम्ही मणिपूरमधूनच यात्रेची सुरुवात करणार आहोत. त्यांनी पॅलेस मैदानात यात्रेला परवानगी दिली नाही तर आम्ही दुसरे ठिकाण शोधू. मणिपूर सरकारने यात्रेला परवानगी नाकारली आहे. मंगळवारी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊनही परवानगीबाबत विचार केला जाईल, असे वक्तव्य केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) ही दक्षिण ते उत्तर अशी होती. ही यात्रा 12 राज्यांतून गेली. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा सुमारे साडेचार हजार किलोमीटर प्रवास केला. 'भारत न्याय यात्रा' त्याचा दुसरा टप्पा असेल.

इम्फाळ येथून 14 जानेवारीला ही यात्रा सुरू होणार असून 20 मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) या यात्रेत तब्बल 6 हजार 200 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. बहुतेक प्रवास बसमधून असेल. ठिकठिकाणी पदयात्राही काढल्या जाणार आहेत.

R...

Rahul Gandhi and Bharat jodo Yatra
Rajya Sabha Election : एकही आमदार न जिंकलेल्या राज्यात भाजपने दिला उमेदवार; इतिहास घडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com