Congress News Sarkarnama
देश

Donate For Desh : काँग्रेसला दान देण्यात महाराष्ट्राचा मोठा 'हात' ; 24 तासांत कोटीचे उड्डाण...

Congress : 28 डिसेंबरपर्यंत या काँग्रेसच्या स्थापनादिनापर्यंत ही मोहीम ऑनलाईन सुरू राहणार...

Rajanand More

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निधी गोळा करण्यास सुरूवात केली आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पक्षाने देशासाठी दान ही मोहीम हाती घेतली असून देशवासीयांना देणगी देण्याची आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम सोमवारी सकाळी सुरू झाल्यानंतर 24 तासांतच काँग्रेसच्या खात्यात सुमारे 1 कोटी 45 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.

काँग्रेसने (Congress) 138 व्या स्थापना दिनानिमित्त (Foundation Day) या मोहिमेद्वारे 138 रुपये, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा या रकमेच्या 10 पट देणगी देण्याचे आवाहन केले आहे. 28 डिसेंबरपर्यंत पक्षाच्या स्थापना दिनापर्यंत ही मोहीम ऑनलाईन सुरु राहणार आहे. त्यानंतर या मोहिमेतंर्गत पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रत्येक बूथमधील किमान 10 घरांमधून 138 रुपयांची देणगी जमा करतील. देणगी देणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे.

पक्षाचे खजिनदार अजय माकन (Ajay Makan) यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत देणगीस्वरुपात काँग्रेसच्या खात्यात 1 कोटी 45 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा (Maharashtra) आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा (Delhi) क्रमांक लागतो.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातून सुमारे 30 लाख 60 हजार, राजस्थानातून 12 लाख 98 हजार, उत्तर प्रदेशातून 10 लाख 89 हजार, दिल्लीतून 10 लाख 58 हजार आणि कर्नाटकात 10 लाख 51 हजार रुपये देणगी जमा झाली आहे. सोमवारी ही मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या आठ तासांत 1 कोटी 6 लाख रुपये जमा झाले होते. त्यामध्ये 47 हजार 587 जणांनी देणगी दिली होती.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मंगळवारी ऑनलाईन देणगी जमा केली. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 1 लाख 38 हजार रुपयांची देणगी दिली. दरम्यान, पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT