Parliament Winter Session : निलंबित खासदारांकडून उपराष्ट्रपतींची मिमिक्री; राहुल गांधींकडून व्हिडिओ शुटिंग

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांच्याकडून राज्यसभेत नाराजी...
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar Sarkarnama

Lok Sabha Winter Session 2023 : संसदेचे हिवाळी अधिवेशन केंद्र सरकार आणि विरोधकांमधील खडाजंगीने गाजत आहे. लोकसभा घुसखोरी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला जाब विचारला जात आहे. तर सरकारकडून आतापर्यंत 141 खासदारांचे निलंबन करण्यात आल्याने विरोधकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यानंतर आता आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. एका निलंबित खासदाराने संसदेच्या आवारातच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मिमिक्री केली. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करत होते.  

निलंबित खासदारांनी मंगळवारी सकाळी संसद (Parliament) परिसरात एकत्रित येत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे (TMC) निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी (MP Kalyan Banerjee) हे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभागपी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची मिमिक्री करताना दिसले. धनखड यांनी राज्यसभेतील ४६ खासदारांचे निलंबन केले आहे. यावेळी त्यांनी खासदारांचे कान टोचले होते.

Jagdeep Dhankhar
Congress : गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी, संख्याबळ 16 वर

बॅनर्जी हे मिमिक्री करत असताना राहुल गांधी यांच्याकडून व्हिडीओ शुटिंग केले जात होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर धनखड हेही विरोधकांवर संतापले होते. सभागृहातील एक वरिष्ठ सदस्य सभापतींची मिमिक्री करत होते आणि दुसरे सदस्य त्याचे व्हिडीओ काढत होते. हे खूप हास्यास्पद आणि लाजीरवाणी गोष्ट आहे, अशी नाराजी धनखड यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपनेही यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. भाजपकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीका केली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की, विरोधी खासदारांना निलंबित का केले, असा विचार देशातील लोक करत असतील तर त्याचे उत्तर इथे आहे. खासदार कल्याण बॅनर्जी उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवत आहेत आणि राहुल गांधी त्यांचा जयजयकार केला. ते संसदेप्रति किती बेजबाबदार आहेत, याची कल्पना येऊ शकते, अशी टीका भाजपने केली आहे.

दरम्यान, लोकसभा व राज्यसभेत आतापर्यंत 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मंगळवारी लोकसभेतून 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा घुसखोरी प्रकरणात दोन्ही सभागृहात निवेदन करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. त्यासाठी कामकाज सुरू झाल्यानंतर जोरदाऱ घोषणाबाजी केली जात असल्याने हे निलंबन करण्यात आले आहे.

(Edited By - Rajanand More)

Jagdeep Dhankhar
Sharad Pawar News: खासदारांचे निलंबन हे खेदजनक...; पवारांचे उपराष्ट्रपतींना पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com