PM Narendra Modi Sarkarnama
देश

Mallikarjun kharge On Narendra Modi : नरेंद्र मोदींनी स्वतःचे नाव 758 वेळा घेतले , महागाई, बेरोजगारीचा किती वेळा उल्लेख?

Roshan More

Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला एक दिवस बाकी असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींनी काँग्रेसचे नाव किती वेळा घेतला, हिंदू-मुस्लिम किती वेळा उच्चाराला याची आकडेवारीच मल्लिकार्जून खर्गे यांनी मांडली आहे.

'मागील 15 दिवसांच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी 421 वेळा मंदिर-मस्जिद, मुस्लिम आणि अन्य धर्माची नावे घेतली. पण महागाई आणि बेरोजगारीवर ते एकही शब्द बोलले नाही', असा हल्ला मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर चढवला.

मागील 15 दिवसांत मोदींनी काँग्रेसचा Congress उल्लेख 232 वेळा केला तर, 758 वेळा स्वतःचं 'मोदी' नाव घेतलं, 573 वेळा इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांचा उल्लेख मोदींनी केला. पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार मानत आहेत, असे देखील खर्गे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी सर्वाधिक प्रचार सभा लोकसभा निवडणुकीत घेतल्या. पंतप्रधान मोदींनी 76 दिवस प्रचार केला. त्यात त्यांनी 206 सभा घेतल्या. त्यात सरासरी दिवसाला त्यांनी तीन सभा घेतल्या आहेत.तसेच रोड शो राजकीय कार्यक्रम केले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 68 दिवस पंतप्रधान मोदींनी प्रचार केला होता. या 68 दिवसांत त्यांनी 145 सभा घेतल्या होत्या. 2019 च्या सभांच्या तुलनेत त्यांनी जास्त सभा घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रचारासाठी अवघे आठ दिवस 2019 च्या तुलनेत अधिक मिळाल्याचे दिसून येत आहे.

राहुल गांधींच्या किती सभा?

निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 107 सभा घेतल्या. तर, प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांच्या बरोबरीने 106 सभा घेतल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी 100 पेक्षा अधिक सभा घेतल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT