Lok Sabha Election 2024 : पोलिसांच्या 'या' आदेशामुळे विजयानंतरही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार; कारण काय?

Sunil Phulari Press Conference: कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, माढा, सोलापूर, बारामती यासह परिक्षेत्रातील अनेक मतदारसंघात निकालाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
sunil phulari
Sunil phularisarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 31 May : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी पार पडणार आहे. गेल्या महिनाभरात संपूर्ण देशात राजकारण ढवळून निघालं असताना शुक्रवारी (ता. 30) शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली.

देशातील 543 जागांचे निकाल 4 जून रोजी स्पष्ट होणार आहेत. सर्वत्र निकालाबाबत उत्कंठा लागून राहिली आहे. प्रशासन सर्वतोपरी सज्ज झाला असून पोलिस प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून विशेष काळजी घेतली आहे.

कोल्हापूर महानिरीक्षक परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण भागातील लोकसभा मतदारसंघात देखील पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त निकाल सुरळीत पाडण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, माढा, सोलापूर, बारामती यासह परिक्षेत्रातील अनेक मतदारसंघात निकालाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मतदारसंघात ठिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. "कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शिवाय 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निकालानंतर विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना मिरवणुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. विजयी मिरवणुकीसाठी परवानगी नाही," अशी माहिती सुनील फुलारी यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पोलिस प्रशासन सज्ज आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी ही रमणमळा परिसरात होणार आहे.

तर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी ही राजाराम तलाव परिसरात होणार आहे. या दोन्ही ठिकाणी दोन अप्पर पोलिस अधीक्षक, सात पोलिस उपाधीक्षक, 26 पोलिस निरीक्षक, 91 पोलिस उपनिरीक्षक, 996 पोलिस अंमलदार, 1500 होमगार्ड, 2 सीआरपीएफ फोर्स, 2 एसआरपीएफ फोर्स तैनात करण्यात येणार आहेत.

sunil phulari
Ritesh Kumar News : होमगार्ड व्हायचंय! नऊ हजार जागा भरणार, मानधनही वाढणार

दरम्यान, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कालावधीत एकूण 22 गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये प्रचार सभांना परवानगी न घेणे, व्हिडिओ व्हायरल करणे, बदनामी करणे असे गुन्हे नोंद आहेत.

शिवाय मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 1 गुन्ह्यांची पुष्टी झालेली आहे. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

sunil phulari
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरला मतमोजणीची प्रतीक्षा; 27 फेऱ्या, 104 कर्मचारी अन् 84 टेबल...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com