BJP news Sarkarnama
देश

National Election Watch: भाजपच्या 75 उमेदवारांचे लीड घटले; गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्क्यांची घसरण

सरकारनामा ब्यूरो

‘एडीआर’ आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ यांनी यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचे सविस्तर विश्लेषण केले आहे. देशातील ५४३ पैकी ५४२ मतदारसंघांत त्यासाठी पाहणी करण्यात आली होती. गुजरातच्या सुरतमधील भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने हा मतदारसंघ वगळण्यात आला होता.

भाजपच्या २३९ विजयी उमेदवारांपैकी ७५ (३१ टक्के) उमेदवारांना ५० टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत. काँग्रेसमध्ये ९९ पैकी ५७ (५८ टक्के) उमेदवार हे पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रादेशिक पक्षांचा विचार केला असता समाजवादी पक्षाचे ३७ पैकी ३२, तृणमूल काँग्रेसचे २९ पैकी २१ आणि ‘द्रमुक’चे २२ पैकी १४ उमेदवार हे पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी मते घेऊन विजयी झाले आहेत.

यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांनी सरासरी ५०.५८ टक्के मते मिळविली आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतील मतांची सरासरी संख्या ही ५२.६५ टक्के एवढी होती. २७९ विजयी उमेदवारांनी (५१ टक्के) उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या लक्षात घेता अर्ध्यापेक्षा अधिक मते मिळविली तर २६३ (४९ टक्के) विजयी उमेदवार अर्ध्यावरच अडकले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. मागील निवडणुकीचा विचार केला असता यंदा बहुतांश उमेदवार हे सरासरी ५०.५८ टक्के एवढी मते घेऊन विजयी झाल्याचे दिसते.

सर्वच विजयी उमेदवारांची सरासरी मते ही २ टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संघटनेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. ज्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्याआधी स्वतःवर दाखल गुन्ह्यांची माहिती दिली होती त्यापैकी ४५ टक्के उमेदवारांना ५० टक्के आणि त्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT