Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin YojanaSarkarnama

Ladki Bahin Yojana: तलाठ्यानंतर आता ग्रामसेवकाचेही निलंबन; लाडकी बहीण योजनेत फसवणूक

Hingoli Gramsevak Mukund Ghansawant suspended: लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी घनसावंत यांनी ग्रामस्थांची अडवणूक करत आर्थिक रकमेची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Published on

बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची लुट होत असल्याचे दररोज नवीन प्रकार समोर येत आहेत. अमरावती,अकोला येथे तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे घेत असल्याचा गंभीर प्रकार आढळल्यानंतर आता हिंगोलीतही 'लाडकी बहीणी'ची अशीच फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोल्यातील एका तलाठ्याचे निंलबन झाल्यानंतर आता हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबन केले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी घनसावंत यांनी ग्रामस्थांची अडवणूक करत आर्थिक रकमेची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. योजनेसाठी उत्पन्नाचा दाखल्यासाठी अकोल्यातील तलाठी राजेश शेळके पैसे घेत होता, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले आहे. शेळके याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: 'लाडली बहीण'ची आर्थिक लूट करणं तलाठ्याला भोवलं; निलंबनानंतर आता गुन्हा दाखल

जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथील तलाठ्याने कागदपत्र घेण्यासाठी आलेल्या महिला पुरुषांसोबत अरेरावी करून पैसे घेण्याचा आरोप करण्यात आला होता. अनेक नागरिकांनी या तलाठ्याने पैसे घेतल्याचे आरोप माध्यमांसमोर केले आहे.

जिल्हा प्रशासन या तलाठ्याची चौकशी तर सोडाच पण कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र तरीही फक्त कारणे दाखवा नोटीस तलाठ्याला बजावून जिल्हा प्रशासनाने हात झटकले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com