Election Commission Sarkarnama
देश

Loksabha Election : अंतिम मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने जाहीर केला मोठा निर्णय!

Election Commission : राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेला आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election final voter list : देशभरातील सर्वच राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेला आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. एकीकडे राजकीय पक्ष निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, उमेदवार आणि मतदारसंघाची निश्चिती करत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगही लोकसभा निवडणुकासाठी काम करताना दिसत आहे. दरम्यान, निवडणूक आयागाकडून मतदार याद्यांसंदर्भात एक मोठी अपडेट जारी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी(Loksabha Election) अंतिम मतदार यादी आता 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे, जी या अगोदर 5 जानेवारी रोजी जाहीर केली जाणार होती. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे मतदार यादीत आणखी नवीन मतदारांचा समावेश होणार आहे. शिवाय, दुबार आणि मृत्यू झालेल्यांची नावेही मतदार यादीतून वगळता येणार असून, मतदार यादी अधिक बिनचूक होण्यास मदत होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय निवडणूक आयोगाने(Election Commission) महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ, उत्तराखंड आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्याच्या मुदतमध्येही बदल केला आहे. केंद्रीय निवडणूक आय़ोगाचे अप्पर सचिव राजेश कुमार सिंग यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत(voter list) नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला आहे.

यामध्ये पूर्व पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे -

(अनुक्रमे पुनरीक्षण उपक्रम, कालावधी, सुधारित कालावधी या क्रमाने) :

दावे व हरकती निकालात काढणे 26 डिसेंबर 2023 पर्यंत - 12 जानेवारी 2024, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई - 1 जानेवारी 2024, 17 जानेवारी 2024. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे - 5 जानेवारी 2024, 22 जानेवारी 2024 रोजी होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT