किरण कवडे -
Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची पुढील वर्षात निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर विभागातील पाच जिल्ह्यातील 53 हजार 518 मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. या मतदार यादीवर 9 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रत्येक वेळी नवीन मतदारांची नोंदणी करुनच ही निवडणूक होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने मतदारनोंदणी करावी लागते. निवडणूक विभागाने या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
प्रारुप मतदरयादीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक 17 हजार 963 मतदारांची तर, अहमदनगर (13421), नंदुरबार (3443), धुळे (7392) व जळगाव (11299) मतदारांची नोंद झाली आहे. यात अजून वाढ होण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी 53 हजारांपर्यंत मतदारांची नोंद झाली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.