Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi Lok Sabha Membership : 'इंडिया'चे राहुल गांधी संसदेत काय बॅटिंग करणार...; मोदींना घेरणार ?

Rahul Gandhi News : १३६ दिवसांनंतर राहुल गांधी आज संसदेत आले.

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधी आज (सोमवारी) संसदेत दाखल झाले. १३६ दिवसांनंतर ते संसदेत आले. मोदी सरकारला सळो की पळो करून सोडणारे राहुल गांधी सभागृहात आज काय बॅटिंग करणार, याबाबत उत्सुकता आहे.

मार्च महिन्यात त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आता राहुल गांधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आमने-सामने येणार आहेत. सभागृहात येण्यापूर्वी त्यांनी संसद भवन आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

यावेळी विरोधी पक्षाच्या आघाडीतील (इंडिया) नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक,फार्मसी (दुरुस्ती) विधेयक, मध्यस्थी विधेयक आज मांडण्यात येणार आहेत.

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. मोदी आडनाव प्रकरणी दोन वर्षांच्या शिक्षेनंतर 24 मार्च रोजी खासदारपद गेले होते. 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली.

तीन दिवसांनंतर आज (सोमवारी) त्यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेचा प्रचार करत असताना राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून आक्षेपार्ह विधान केले होते.

"राहुल गांधी यांनी खासदारकी पुन्हा बहाल केल्यामुळे मोदी सरकारला चपराक बसली आहे. लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात राहुल गांधींनी बोलू नये, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची भावना सगळ्यांची होती. या निर्णयामुळे त्यांना संसदेत बोलण्यापासून मोदी सरकारने थांबवू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे," अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT