Maharashtra Cabinet Expansion : कोल्हापूर जिल्ह्यात दुसरे मंत्रिपद मिळणार का ? 'या' आमदाराचे नाव चर्चेत..

Maharashtra Politics : प्रकाश आबिटकर यांची सध्या दुसरी टर्म सुरू आहे.
Prakash Abitkar
Prakash Abitkar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जाते. केंद्राने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली आहे. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सलग दोन वेळा डावललेले शिवनसेनेचे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांना आता संधी मिळणार का? अशी उत्सुकता आहे.

Prakash Abitkar
Vinayak Raut Slams Uday Samant : उदय सामंत दळभद्री ; खासदार राऊतांची जहरी टीका

राधानगरी विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांची सध्या दुसरी टर्म सुरू आहे. 2014 ला कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले, मात्र सत्ता असूनही कुणालाही मंत्रीपद दिले नाही. त्यानंतर 2019 ला शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार पराभूत झाले आणि केवळ प्रकाश आबिटकर हेच निवडून येण्यात यशस्वी ठरले. त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता आली आणि एकमेव आमदार असल्याने प्रकाश आबिटकर यांना संधी मिळेल असे चित्र होते. मात्र ऐनवेळी अपक्ष असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना संधी दिली गेली. याकाळात कधीही आबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली नाही

Prakash Abitkar
Kumar Saptarshi PIL Filed ON Bhide : भिडेंच्या अडचणीत वाढ ; कुमार सप्तर्षीं यांच्याकडून जनहित याचिका दाखल

शिवसेना फुटल्यानंतर प्रकाश आबिटकर यांनी शिंदे गटासोबत रहाणं पसंत केलं. त्यावेळीही मंत्रीपद मिळेल अशी शक्यता होती मात्र त्यावेळीही मंत्रीपदाने हुलकावणी दिली. प्रकाश आबिटकर यांची विधानसभा मतदारसंघात ताकद आहेच. त्याशिवाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठीही आबिटकर महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळावं, अशी लोकांची मागणी आहे. त्यामुळे शिवनसेनेच्या एकमेव आमदाराला आतातरी संधी मिळणार का याची उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्यातीलच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातीलही राजकीय चित्र बदलले आहे. जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने आता पुन्हा जिल्ह्यात मंत्रिपद मिळणार का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com