Kangana Ranaut Sarkarnama
देश

Kangana Ranaut : ठाकरे CM असताना बुलडोझरने पाडलेला कंगनाचा ‘तो’ बंगला विक्रीला; किंमत पाहून बसेल धक्का... 

Mumbai House BMC : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बीएमसीने कंगना रनौत यांच्या बंगल्याचे काही बांधकाम पाडले होते.

Rajanand More

Mumbai : खासदार कंगना रनौत यांनी मुंबईतील आपला बंगाल विक्रीला काढल्याची माहिती समोर आली आहे. हा तोच बंगला आहे, त्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवला होता. जवळपास चार वर्षानंतर हा बंगाल पुन्हा चर्चेत आला आहे.

कंगना यांचा मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात आलिशान बंगला आहे. याच बंगल्यामध्ये त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे कार्यालयही आहे. सप्टेंबर 2020 मध्ये बीएमसीने या बंगल्याचा काही अनिधिकृत भाग पाडला होता. त्यावरून बरेच राजकारण झाले होते. तेव्हापासून कंगना यांनी शिवसेनेविरोधात जणू मोहिमच उघडली.

दरम्यान, कोड इस्टेट या यू-ट्यूब चॅनेलही संबंधित बंगला विक्रीला काढल्याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार या बंगल्याचा किंमत तब्बल 40 कोटी रुपये निश्चित असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण बंगला दाखवण्यात आला आहे.

कंगना रनौत या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्या मतदारसंघ आणि दिल्लीतच अधिक वेळ घालवत असल्याने मुंबईतील बंगला विक्रीला काढल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत कंगना यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काय घडलं होतं चार वर्षांपूर्वी?

मुंबई महापालिकेने सप्टेंबर 2020 पथकाने कंगना यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. कंगना यांच्या कर्मचाऱ्यांनी नोटीस न स्वीकारल्याने बंगल्याच्या दर्शनी भागी ती लावण्यात आली होती. बंगल्यात झालेल्या कामाच्या परवानगीची कागदपत्रे 24 तासांत सादर करण्याची मुदत यामध्ये तिला देण्यात आली आहे.

कंगना यांनी 24 तासांत पुरावे सादर न केल्यास पालिका हे बांधकाम बेकायदा ठरवून तोडू शकते, असा इशारा देण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर महापालिकेने बुलडोझरने बंगल्यातील अनधिकृत भाग पाडून टाकला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT