Jairam Ramesh : NTA ची 448 कोटींची घसघशीत कमाई; मोदी सरकारसाठी बनले महसुलाचे साधन...

Natinal Testing Agency NTA NEET : काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तराच्या हवाल्याने हा दावा केला आहे.
Jairam Ramesh
Jairam RameshSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : नीट परीक्षेतील घोळाचा मुद्दा ताजा असतानाच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकार गंभीर आरोप केला आहे. नीटसह विविध परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) मागील सहा वर्षात विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारत तब्बल 448 कोटी रुपये कमावले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी मागील आठवड्यात राज्यसभेत एनडीएला मिळालेल्या महसुलाबाबत माहिती दिली आहे. त्याआधारे जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने विविध शुल्कातून एनडीएला मागील सहा वर्षांत तब्बल 3 हजार 513 कोटी रुपये मिळाले आहेत.

Jairam Ramesh
Supreme Court on Governor : सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ‘त्या’ राज्यपालांना फटकारलं! म्हणाल्या, नको तिथं..!

एनटीएने 3 हजार 64 कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. हा खर्च वजा केल्यास एनटीएलल निव्वल नफा 448 कोटींचा झाला असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून नीट परीक्षेचा मुद्दा तापला आहे.

जयराम रमेश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नीट घोळाच्या केंद्रस्थानी एनटीए ही संस्था आहे. विविध परीक्षा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून घेण्याचे काम ही संस्था करते. हे आऊटसोर्सिंग संशयास्पद व्यक्तींकडून केले जाते. असंख्य घोटाळे झालेल्या मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे प्रमुखच या संस्थेचे नेतृत्व करत आहेत.

Jairam Ramesh
Chirag Paswan : दलित मंदिरात गेले तर गंगाजलाने..! केंद्रीय मंत्र्यांनीच दाखवला आरसा

विविध परीक्षांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून एनटीए मोठ्या प्रमाणात पैसे जमा करते, मात्र त्याचा उपयोग परीक्षांच्या आयोजनासाठी केला जात नाही. या पैशांतून संस्था स्वत:हून परीक्षा राबविण्यासाठी सक्षम होऊ शकते, असा जयराम रमेश यांचा रोख आहे. या सरकारसाठी पैसा कमविण्याचे साधन म्हणजे लाखो युवकांचे भवितव्य बनले आहे, असा निशाणा जयराम रमेश यांनी साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com