Lok Sabha Security Breach :  Sarkarnama
देश

Lok Sabha Security Breach : हा दहशतवादी हल्ला असल्याचं दिल्ली पोलिसांनीच शाह यांना सांगितलं!

Delhi Police : केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Rajanand More

Parliament Security : लोकसभेत झालेल्या घुसखोरीनंतर आता सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्र्यांनी ससंदेत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर भाजपच्या नेत्यांकडून विरोधक या घटनेचे राजकीय भांडवल करत असल्याची टीका केली जात आहे. ही सुरक्षेतील चूक असली तरी आता या घुसखोरीला दहशतवादी कृत्याचे स्वरुप देण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, दिल्ली पोलिसांनीच या घटनेला दहशतवादी हल्ल्याचे (Terror Attack) स्वरुप दिले आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दिलेल्या अहवालातच तसेच नमूद करण्यात आले आहे. हा विषय शाहांच्या खात्यांतर्गत येतो. त्यामुळे विरोधकांकडून याचे राजकारण केले जात नाही.

आम्ही या घुसखोरीला कधीही दहशतवादी हल्ला म्हटलेले नाही. आम्ही केवळ सुरक्षेतील चुकीबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत आहोत. संसदेची नवीन इमारत जगातील सर्वात सुरक्षित जागा असल्याचे सांगितले जात होते. सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्या सदस्यांना दंड करण्यात आला आहे. १४ खासदारांना निलंबित करण्याचे कारण काय?, असा सवाल वेणुगोपाल यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शुक्रवारी विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता सोमवारी पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून या मुद्यावरून आवाज उठवला जाण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी संसदेत याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनेशी संबंधित पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये ललित झा, अमोल शिंदे, सागर शर्मा, मनोरंजन डी आणि नीलम यांचा समावेश आहे. त्यांची सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर घुसखोरीचा कट रचला होता.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT