Shivraj Singh Chouhan : गुन्हा करण्याचा हेतू नव्हता...! शिवराज सिंह चौहान यांनी मागितली न्यायाधीशांची माफी, काय आहे प्रकरण?

ABVP : चौहान यांनी मुख्य न्यायाधीश रवी मलिमथ यांना पत्र लिहिले आहे.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chouhansarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्र लिहून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची माफी मागितली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दोन पदाधिकारी एका व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी एका न्यायाधीशाची कार जबरदस्ती घेऊन गेले होते. या प्रकरणात चौहान यांनी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्य न्यायाधीशांची माफी मागितली आहे.

चौहान यांनी मुख्य न्यायाधीश रवी मलिमथ यांना पत्र लिहिले आहे. अभाविप ग्वाल्हेरचे सचिव हिमांशु श्रोत्रिय आणि उप सचिव सुकृत शर्मा यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी एका न्यायाधीशांच्या कारची चावी हिसकावून घेत कार पळवून नेली होती. हृदयविकाराचा झटका आलेले रणजीत सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या कारचा वापर केल्याचा दावा दोघांनी केला आहे.

Shivraj Singh Chouhan
Dheeraj Sahu : साडेतीनशे कोटींचे घबाड कुणाचे? धीरज साहू पहिल्यांदाच बोलले, मागील 30 ते 35 वर्षात...

ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाबाहेर न्यायाधीशांची कार उभी करण्यात आली होती. याच कारमधून रणजीत सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 'अभाविप'च्या (ABVP) या दोन पदाधिकाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीनही फेटाळला असून सध्या ते न्यायालयीने कोठडीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही घटना समोर आल्यानंतर शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी थेट मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून माफी मागितली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, हा एका पवित्र हेतूने केलेला गुन्हा आहे. एका व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी मानवी दृष्टीकोनातून हे केले आहे. त्यामुळे त्यांना माफ करायला हवे. दोघांचा हेतू गुन्हा करण्याचा नव्हता. त्यामुळे त्यांना माफ करा, अशी विनंती चौहान यांनी केली आहे.

Shivraj Singh Chouhan
Lok Sabha Security Breach : संसदेत घुसखोरीचा हा होता 'प्लॅन बी'

दरम्यान, दोघांचा जामीन अर्ज फेटाळताना विशेष न्यायाधीश संजय गोयल यांनी म्हटले होते की, एखादी व्यक्त विनम्रपणे मदत मागते, ताकदीचा वापर करून नाही. आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. त्यावेळी एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली होती, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.

(Edited By - Rajanand More)

Shivraj Singh Chouhan
Onion Export Ban Issue : ‘शुगर लॉबी’पुढे सरकार झुकले; कांदा उत्पादक वाऱ्यावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com