Sunil Tatkare, Sharad Pawar Sarkarnama
देश

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी लोकसभेत आठ मिनिटांत चारवेळा घेतले शरद पवारांचे नाव!

Lok Sabha Session 2024 Sharad Pawar NCP : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत मंगळवारी सुनील तटकरे यांनी सहभाग घेतला.

Rajanand More

New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी लोकसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. मात्र, त्याचवेळी त्यांनी आठ मिनिटांच्या भाषणात चार वेळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले. तसेच त्यांना दोनदा दैवतही म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मंगळवारी तटकरे यांचे भाषण झाले. ते म्हणाले, नरेंद्र मोदींना 62 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सलग तीनवेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळाला, याचा पोटशूळ विरोधकांच्या मनात निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ममता बॅनर्जी यांनी तृणमूल पक्षाची स्थापना काँग्रेस नेतृत्वाच्या हुकूमशाहीमुळे केली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. श्रध्देय पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. ते दैवत आहेत. पण आम्हालाही 1999 मध्ये कुणामुळे पक्ष काढावा लागला, हा इतिहास कुणाला विसरता येणार नाही, अशी टीका तटकरे यांनी काँग्रेसवर केली.

अमोल कोल्हेंनी काल नैतिकतेचा आधार सांगितला. आज त्यांना विचारायचे आहे. शरद पवारसाहेब आमचे दैवत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. लवासा येथे लेक सिटी प्रस्तावित केली. त्यावर सर्वाधिक टीका काँग्रेसने केली, याची आठवण तटकरे यांनी करून दिली.

यूपीएचे सरकार होते. पवारांचे स्थान तिसऱ्या स्थानावर होते. जयराम रमेश त्यावेळी पर्यावरण मंत्री होते. त्यांनी हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प रद्द केला. तथ्यहीन आरोप त्यावेळी आदरणीय पवारसाहेबांवर केले गेले, असे तटकरे म्हणाले.

नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना त्यावेळी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी बोलवले होते. हा प्रकल्प योग्य कसा आहे, हे त्यांनी महाराष्ट्रात येऊन सांगितले. ज्या यूपीए सरकारमध्ये असताना आपल्यास सहकारी पक्षांसोबत ते कसे वागत होते, याचा विचार करण्याची वेळ आल्याचे तटकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT