Parliament Session Live : महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर..! TMC च्या खासदारांना पवार-ठाकरेंवर भलताच कॉन्फिडन्स

Kalyan Banejee Lok Sabha Session Maharashtra Assembly Election : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रसेचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार भाषण केले.
Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Sharad PawarSarkarnama

New Delhi : लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. यादरम्यान विरोधकांकडून एनडीए सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी हल्लाबोल केला.

बॅनर्जी यांनी भाजपवर टीका करताना सरकार फार काळ टिकणार नसल्याचे संकेत दिले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा संदर्भही दिला. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका होऊद्या, सरकार राहणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
VK Sasikala : जयललितांची मैत्रीण शशिकला यांचा दबदबा कायम; AIADMK तून 17 जणांची हकालपट्टी

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा विजय होईल, असा विश्वास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. इतर राज्यांमधील पक्षांतील नेत्यांचा आता आघाडीतील नेत्यांवरही कॉन्फिडन्स वाढल्याचे बॅनर्जी यांच्या विधानावर स्पष्ट झाले आहे.

अखिलेश यादव यांनीही हे सरकार पराभूत सरकार असल्याचे म्हटले आहे. हे सरकार पराभूत झालेले असून जनता म्हणत आहे की, हे सरकार फार काळ चालणार नाही, सरकार कोसळणार आहे. 15 ऑगस्ट 1947 हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आणि आता 4 जून हा सांप्रदायिक राजकारणातून स्वातंत्र्याचा दिवस असेल. या निवडणुकीने देशाला तोडणाऱ्या राजकारणाला तोडले आहे, अशी टीका अखिलेश यांनी केली.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Chandrababu Naidu : मोदींचे मित्र चंद्राबाबू आणि रेवंथ रेड्डींची बंद दाराआड होणार चर्चा? राजकीय चर्चांना उधाण

हा देश आता कुणाच्या वैयक्तिक आकांक्षांवर चालणार नाही. जनतेच्या आकांक्षांवर चालेल, असा टोला अखिलेश यांनी लगावला. ईव्हीएमवर आपला कधीच विश्वास नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत आपल्या सर्व जागा निवडून आल्या तरी ईव्हीएमला विरोध कायम असेल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com