Nilesh Lanke Sarkarnama
देश

Video Nilesh Lanke : आधी आंदोलन, आता निलेश लंकेचे लोकसभेतही दणक्यात भाषण; नगरसाठी मोठी मागणी...

Lok Sabha Session Milk Rate Issue : निलेश लंकेंनी सोमवारी लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या शेजारी बसल्या होत्या.

Rajanand More

New Delhi : अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंनी सोमवारी लोकसभेत दणक्यात भाषण केले. जवळपास दहा मिनिटांच्या भाषणात त्यांनी दूध दरवाढीसह शेतीविषयक विविध मुद्यांवर भाषण ठोकले. तसेच यादरम्यान त्यांनी नगर जिल्ह्यासाठी मोठी मागणीही केली.

निलेश लंकेंनी दूध दरवाढीसाठी नगरमध्ये काही दिवसांपूर्वीच आंदोलन केले होते. त्यानंतर हा मुद्दा त्यांनी थेट लोकसभेत मांडला. एकेकाळी आपला देश कृषीप्रधान होता. आत देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे दुधाला दर मिळायला हवी, अशी मागणी लंकेंनी केली.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी उभी केलेली महानंदा ही डेअरी एनडीडीबीकडे सोपवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दूध व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काची डेअरी केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे राज्याबाहेर गेली, ही अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत लंकेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

अर्थसंकल्पात दुग्धव्यवसायाला सहायक उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुग्धव्यवसाय हा अपुऱ्या सुविधा, जनावरांचे आजार आणि दुधाच्या भावातील चढउतार अशा समस्यांना सामोरे जात आहे. दुधाला उत्पादन खर्चावर बाजारभाव ठरायला हवा. आत उत्पादन खर्च 40 ते 41 रुपये आहे. तरी किमान आधारभूत किंमतीच्या कक्षेत हे भाव आणले जावे. दुधाला एमएसपी मिळावी, अशी आग्रही मागणी खासदार लंकेंनी केली.

केंद्र सरकारने दुधाला एमएसपीअंतर्गत आणून कृषी मूल्य आयोगाप्रमाणे एखाद्या सुनिश्चित यत्रणेच्या माध्यमातून योग्य दर निर्धारित करणे आवश्यक आहे. पशुखाद्याच्या किंमतींवरही निर्बंध घालणे गरजेचे आहे. हे दर वारंवार वाढत चालले आहेत. या खाद्याची गुणवत्ताही तपासणे आवश्यक आहे. याबाबत अनेक तक्रारी येत आहेत, असे लंकेंनी सांगितले.

नगरसाठी मोठी मागणी

देशातील प्रत्येक तालुक्यात दूध प्रक्रिया केंद्र सरकारने उभे केले पाहिजे. नगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे. केंद्र सरकारने प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात अशी केंद्र सुरू करावी, अशी मोठी मागणी लंकेंनी लोकसभेत केली. त्यातून विविध उत्पादने तयार करून स्थिर आणि सातत्यपूर्ण बाजार मिळण्यासाठी मदत होईल. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास लंकेंनी व्यक्त केली.

मिल्क कुलरसाठी अनुदान, दुग्धविकास कर्ज, व्यवसायासाठी पायाभूत सुविधा, कर्जामध्य वाढ करणे, राष्ट्रीय गोकुळ मिशन, आदी मुद्यांवरही लंकेंनी भाष्य केले. त्यांनी जवळ दहा मिनिटे भाषण केले. त्यांचे लोकसभेतील हे पहिलेच भाषण होते. याचा फायदा घेत त्यांनी मतदारसंघातील महत्वाचा मुद्दा लोकसभेत मांडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT