New Delhi : मणिपूरच्या मुद्यावर लोकसभेत विरोधकांनी आंदोलन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान प्रचंड घोषणाबाजी केली जात आहे. मणिपूर को न्याय दो, शेम-शेम, तानाशाही नहीं चलेगी... अशा घोषणा दिल्या जात आहेत. या गदारोळातही नरेंद्र मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख केला नव्हता. त्यावरून विरोधकांनी मागील दोन दिवस आपल्या भाषणांमध्ये सातत्याने भाष्य केले होते. मणिपूरमधील सदस्यांना यावर बोलू देण्याची मागणी मंगळवारी विरोधकांकडून केली जात आहे.
पंतप्रधान मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर लगेच विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. दरम्यान, नरेंद्र मोदींनी भाषण सुरूच ठेवत सरकारचे कामाचा पाढा वाचला. ते म्हणाले, आम्ही विकसित भारताच्या निर्माणासाठी जनतेचा आशीर्वाद मागितला होता. जनतेने या संकल्पाला चार चाँद लावत पुन्हा विजयी करत सेवा करण्याची संधी दिली आहे. देश जेव्हा विकसित होतो, तेव्हा कोटी-कोटी लोकांची स्वप्न पूर्ण होतात. येणाऱ्या पिढ्यांसाठीही एक मजबूत पाया तयार होतो, असे मोदी म्हणाले.
विकसित भारताचा थेट फायदा नागरिकांची प्रतिष्ठा, जीवनमान उंचावण्यात होणार आहे. स्वातंत्र्यानंतर सामान्य नागरिक याची वाट पाहत होते. देशवासियांना विश्वास देतो की, विकसित भारताचा जो संकल्प घेऊन आम्ही चाललो आहोत, त्यासाठी पूर्ण निष्ठेने प्रयत्न करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
2014 मध्ये देश निराशेच्या गर्तेत होता. लोकांनी आत्मविश्वास गमावला होता. 2014 आधी विकास खुंटला होता. पण आज भारत काहीही करू शकते, हे लोक म्हणत आहेत. पुर्वी भ्रष्टाचारात अनेकांचे हात माखले होते, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.