PM Narendra Modi : मोदींच्या भाषणावेळी प्रचंड गदारोळ; अध्यक्षांनी राहुल गांधींना खडसावले

Parliament Session Live Lok Sabha Session President Speech Debate : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू आहे.
Narendra Modi in Lok Sabha
Narendra Modi in Lok SabhaLok Sabha
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर येथील सदस्यांना बोलण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. पण अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांकडून जोरदार नारेबाजी सुरूच ठेवण्यात आली.

पंतप्रधानांनी गदारोळातच भाषण सुरू ठेवले. अनेक सदस्यांनी अभिभाषणावर विचार मांडले आहेत. विशेष करून ज्यांनी संसदेच्या सर्व नियमांचे पालन करून नवीन खासदारांनी विचार मांडले. पहिल्यांदाच येऊनही त्यांनी संसदेची प्रतिष्ठा वाढवली आणि आपल्या विचारांनी या चर्चेला अधिक मुल्यवान बनवले, असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला.

Narendra Modi in Lok Sabha
Ashok Chavan News : राज्यसभा सभापतींनी घेतली फिरकी अन् अशोक चव्हाण संतापले !

देशाने एका यशस्वी निवडणूक मोहिम पार करत जगाला दाखवून दिले. मी काही लोकांची अडचण समजू शकतो. सातत्याने खोटे बोलूनही त्यांचा मोठा पराभव झाला. देशातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिली. ही खूप महत्वाची घटना आहे, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi in Lok Sabha
Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी लोकसभेत आठ मिनिटांत चारवेळा घेतले शरद पवारांचे नाव!

बिर्ला राहुल गांधींवर भडकले

विरोधकांची घोषणाबाजी थांबत नसल्याने बिर्ला यांनी मोदींना मध्येच थांबले. ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर चांगलेच भडकले. विरोधी पक्षनेते तुम्हाला हे शोभा देत नाही. संसदीय परंपरेनुसार हे योग्य नाही. हे असे चालणार नाही. संसदेची मर्यादा राखावा. व्हेलमध्ये येण्यासाठी तुम्ही सदस्यांना सांगता, ही खूप चुकीची पध्दत आहे, असे त्यांनी राहुल यांना खडसावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com