Shrirang Barne, Nitin Gadkari Sarkarnama
देश

Lok Sabha Session : रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा थेट लोकसभेत; बारणेंचा प्रश्न अन् गडकरींचे उत्तर...

Shrirang Barne Nitin Gadkari Maval Lok Sabha Constituency : देहूरोड, रावेत बायपास रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याचा मुद्दा श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला.

Rajanand More

New Delhi : पावसाळ्यात राज्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून राजकीय पक्षांसह विविध संस्था-संघटनांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी खड्ड्यांचा मुद्दा थेट लोकसभेत उपस्थित केला. त्याला केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले.

श्रीरंग बारणे यांच्या मावळ मतदारसंघातून पुणे-सातारा महामार्गालगतच्या बायपासवर खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर लोकसभेत बोलताना बारणे म्हणाले, माझ्या लोकसभा मतदारसंघात NH4 मार्गालगत देहूरोड, रावेत असा जाणारा बायपास रस्ता बनवण्यात आला होता. हा रस्ता रिलायन्स कंपनीने बनवला होता.

पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था झाली अनेक खड्डे पडले आहेत. जुना प्रस्ताव रद्द करून नवा प्रस्ताव मंत्रालयाकडून आणला जाईल का, असा प्रश्न बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला. बारणे यांच्या या प्रश्नावर गडकरी यांनीही रस्त्यावर खड्डे पडल्याचे मान्य केले.

गडकरी म्हणाले, बारणे यांनी सांगितलेले खरे आहे. पुणे-सातारा महामार्गालगत त्यांच्या मतदारसंघात जो रस्ता जातो, त्याचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. या पावसात रस्त्याची अवस्था खूप खराब झाली आहे. या रस्त्याबाबत अनेक वर्षांपासून कायदेशीर अडचणी आल्या आहेत.

अनेकदा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. आपण जर त्यांचे काम रद्द केले, मग ते कोर्टात गेले, त्याला स्टे मिळाला तर अडचण होईल. त्यामुळे आम्ही नवीन डीपीआर तयार करून ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन गडकरी यांनी लोकसभेत दिले. या उत्तराने बारणे यांचेही समाधान झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT