Mumbai News : अनेक संघर्षावर मात करत ऑलिम्पिक स्पर्धेत धडक मारलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र करण्यात आले. महिलांच्या 50 किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत वजन वाढल्याने ही अपात्रतेची कारवाई झाल्याने विनेश फोगाट सध्या नैराश्यात आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेतील यावर देशभरात संतापाची लाट असून, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या मथुरामधील खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेचे वेगवेगळे अर्थ निघत असून, काही त्यांना समाज माध्यमांवर ट्रोल देखील केले आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्यावर झालेल्या कारवाईतून धडा घेण्याची गरज असल्याचे भाजप (BJP) खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. "हा प्रकार खूप विचित्र आहे. कोणी 100 ग्रॅम वजन वाढल्याने डिस्क्वालिफाय होत का? विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या फायनलमधून 100 ग्रॅम वजनामुळे डिस्क्वालीफाय झाली. यामधून असे दिसते की, आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे आणि ते किती आवश्यक आहे", असा सल्ला हेमा मालिनी यांनी दिला.
वजनामुळे विनेश फोगाट डिस्क्वालिफाय झाल्याच्या घटनेतून आपण धडा घेतला पाहिजे, आपल्यासाठी योग्य वजन असणे किती महत्वपूर्ण आहे. विशेषतः आम्ही कलाकार आणि महिलांना जागरूक राहण्याची गरज आहे, 100 ग्रॅम वजन देखील किती मॅटर करते. वजनावर सल्ला दिल्यानंतर हेमा मालिनी यांनी कुस्तीपूट विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून डिसक्वालिफाय झाल्याचे आम्हाला दुखः आहे, असे शेवटी म्हटले आहे. तसंच तिने आपले 100 ग्रॅम वजन ताबडतोब कमी करावे. पण आता तिला संधी मिळणार नाही, हे देखील पाहिले पाहिजे, असेही हेमा मालिनी यांनी म्हटले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी महिलांच्या 50 किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. तिचे वजन 100 ग्रॅमने जास्त भरलं आणि भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगले. अवघे 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. या कार्यवाहीनंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेक जणांनी ही कार्यवाही दुर्देवी असल्याचे म्हटले. लोकसभेत देखील यावर गदारोळ झाला. केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. याच दरम्यान मथुरा येथील भाजप खासदार आणि बॉलिवुड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली.
विनेश फोगाट ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारताच्या अनेक आजी-माजी खेळाडू, राजकीय नेते, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. देशभरात विनेशबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. परंतु हेमा मालिनी यांनी विनेश फोगाट हिचे वाढत्या वजनावरून संपूर्ण महिलांना सल्ला दिला. याच सल्ल्यावरून आता त्या ट्रोल होत आहेत. काही त्यांच्या सल्लाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.