ougata Roy and June Malia during a parliamentary session as their viral video trends across social media platforms. sarkarnama
देश

Sougata Roy Video : मोदीही दादा म्हणतात, त्या 78 वर्षीय नेत्याचा तरूण महिला खासदारासोबतचा लोकसभेतील व्हिडीओ होतोय व्हायरल...

Lok Sabha Sougata Roy June Malia : संसदेत चंद्रशेखर आझाद हे भाषण करताना 78 वर्षीय सौगत राॅय आणि महिला खासदार जून मालिया हे गप्पा मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Roshan More

Sougata Roy News : संसदेमधील अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यानाचा संसदेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीएमसीच्या ज्या वरिष्ठ खासदाराला दादा म्हणून संबोधतात ते महिला खासदारासोबत कुठल्यातरी विषयावर चर्चा करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमधील खासदार चंद्रशेखर आझाद हे भाषण करत असताना त्यांच्या मागील बाकावर 78 वर्षीय सौगत राॅय आणि महिला खासदार जून मालिया हे गप्पा मारताना दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सौगत राॅय हे काहीतरी बोलत आहेत. ते ऐकूण मालिया या दुसरीकडे पाहून हसत आहेत. त्यानंतर दोघे हसताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

सौगत राॅय आणि जून मालिया यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर गमतीशीर प्रतिक्रिया येत आहे. ज्येष्ठ खासदार हे तरुण खासदाराला मार्गदर्शन करत असल्याचे काही जण सोशल मिडिया यूजर कमेंटमध्ये म्हणत आहेत.तर, काही नेटकर्त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. चंद्रशेखर आझाद हे काही मुद्दे गांभीर्याने मांडत असताना ज्येष्ठ खासदार ते ऐकायचे सोडून गप्पा मारत आहे, असा संताप देखील काही जणांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून टीका

भाजपने ट्विट करत टीका केली आहे. त्यात म्हटले आहे की, संसदीय अधिवेशने देश आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे असते. येथील प्रत्येक चर्चा देशाच्या भविष्याशी संबंधित असते आणि म्हणूनच खासदारांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते. तथापि, अलिकडेच झालेल्या लोकसभा अधिवेशनात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे खासदार सौगत रॉय आणि जून मालिया एका विषयावर चर्चा सुरू असताना एकमेकांशी विनोद करताना दिसले. संसद हे जनतेच्या अपेक्षांचे व्यासपीठ आहे आणि म्हणूनच प्रत्येक लोकप्रतिनिधीने सभागृहाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य राखावे अशी अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT