Dharashiv opium pod : धक्कादायक! ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने केली अफूची शेती; धाराशिव पोलिसांकडून कारवाई, ओमराजेंनी दिली मोठी अपडेट...

Shiv Sena UBT leader case News : कांद्यासोबत अफूची लागवड करणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाशी उपतालुकाप्रमुखास महागात पडले.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हयातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी कारवाई सुरु आहे. तर दुसरीकडे वाशी तालुक्यातील दसमेगाव शिवारात कारवाई करीत पोलिसाने तब्बल ७३ लाख रुपये किमतीची अफूची बोंडे जप्त केली आहेत. कांद्यासोबत अफूची लागवड करणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाशी उपतालुकाप्रमुखास महागात पडले. धाराशिवच्या गुन्हे शाखेने कारवाई करून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुरुवारी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली. दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपीची पक्षातून तत्काळ हकालपट्टी केली असल्याची माहिती खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी ट्विट करून दिली आहे.

वाशी तालुक्यातील दसमेगाव शिवारात समाधान मनोहर उघडे यांनी कांदा पिकासोबतच अफूची आंतरपीक पद्धतीने लागवड केली होती. तब्बल एक एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात ही अफू जोमाने वाढली. कांद्यापेक्षा उंच वाढ झाल्यानंतर त्यास गुलाबी, पांढरी फुले व बोंडे लागल्याचे स्पष्टपणे दिसत होती. हे पीक संशयास्पद वाटल्याने एका खबऱ्याने पोलिस अधीक्षकांकडे माहिती कळविली.

Beed Crime News
BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना कारवाईची सूचना केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी मेघना आय. एन. यांच्यासह सहायक निरीक्षक सुदर्शन कासार, शौकत पठाण, जावेद काझी, दत्तात्रय राठोड, दयानंद गादेकर, अशोक ढगारे, सुभाष चौरे, नागनाथ गुरव, वाशीचे सहायक निरीक्षक यशवंत घोडके व त्यांच्या टीमने शेतात कारवाई केली.

Beed Crime News
BJP Vs Shivsena UBT : हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा मुस्लिम महापौर; भाजपने दाखवला आरसा; ही तर 'जनाब सेना' म्हणत डिवचले!

पंचासमक्ष पंचनामा करून हे पीक उपटण्यात आले. त्याची फुले व बोंडांचे वजन ४८५ किलोग्रॅम इतके भरले. बाजारभावानुसार जप्त अफूची किंमत तब्बल ७२ लाख ८४ हजार ७५० रुपये इतकी असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.

Beed Crime News
NCP Leadership : ‘विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजितदादांकडे देण्याचा निर्णय पवारांसह सर्व नेत्यांनी घेतला होता’

आरोपी समाधान उघडेने त्या एक एकरात कांद्यासोबत अफूची लागवड केली होती, त्याच्या बाजूंच्या शेतामध्ये ऊस, ज्वारी अशा उंच पिकांचा वेढा होता. त्यामुळे ही अफू कोणाच्या नजरेस येणार नाही, असा होरा आरोपीने बांधला असावा. मात्र, ऊसतोड झाली. शिवाय, अफूही कांद्यापेक्षा अधिक उंच वाढल्याने हे बिंग फुटले.

Beed Crime News
Congress Leader : धक्कादायक! राज्याचे माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने खळबळ

खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केले ट्विट

समाधान उघडे यांनी स्वतःच्या शेतीमध्ये अफूची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनेच्या शिस्तीला धक्का बसला आहे. पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कधीही थारा नाही. त्यामुळे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ट्विट करून दिली आहे.

Beed Crime News
Shivsena-BSP Alliance : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, अमरावतीच्या राजकारणात ट्विस्ट, शिवसेनेची-बहुजन समाज पक्षासोबत युती!

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वाशी उपतालुकाप्रमुख असलेल्या आरोपी समाधान उघडे हा होता. त्याच्या या कृत्याची माहिती समजल्यानंतर वाशी तालुकाप्रमुख तात्यासाहेब गायकवाड यांनी तातडीने जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांना ही माहिती कळवली. त्यानंतर धाराशिव जिल्हा उपप्रमुख प्रदीप मेटे यांनी आरोपीची पक्षातून पक्षातून तत्काळ हकालपट्टी केली असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

आरोपी झाला फरार

पोलिसांनी आपल्या शेतात अवैधरीत्या लागवड केलेल्या अफूवर कारवाई केल्याचे कळताच आरोपी समाधान उघडे गावातून पसार झाला. याप्रकरणी त्याच्यावर वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com