Rahul Gandhi Sarkarnama
देश

Lok Sabha Speaker Election : विरोधी पक्षनेतेपद मिळताच राहुल गांधी लागले कामाला; पहिला डावही यशस्वी...

Rajanand More

New Delhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी रात्री लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर राहुल लगेच कामालाही लागेल असून त्यांचा पहिला डावही यशस्वी ठरला आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. एनडीएने ओम बिर्ला यांना मैदानात उतरवले असून इंडिया आघाडीकडून के. सुरेश रिंगणात आहेत. मागील 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.

के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इंडिया आघाडीमध्ये एकमत नसल्याचे समोर आले होते. आमच्याशी याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला होता. त्यामुळे तृणमूलचे खासदार मतदान करणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली होती.

अखेर राहुल गांधी यांनी मंगळवारी रात्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. राहुल यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत के. सुरेश यांना मतदान करण्याची विनंती ममतांना केली होती. या विनंतीला ममतादीदींनी मान दिल्याचे समजते.

टीएमसीने मंगळवारी रात्री खासदार डेरेक ओब्रायन आणि कल्याण बॅनर्जी यांना मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थान बैठकीसाठी पाठवले होते. त्यानंतर टीएमसीने सर्व खासदारांना मतदानाआधी एकत्र जमण्यास सांगितले आहे.

राहुल यांच्या फोननंत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाला मतदान करण्यास होकार दिल्याने विरोधकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनडीएचे संख्याबळ अधिक असल्याने बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या बाजूने किती खासदार मतदान करतात, याबाबत उत्सुकता आहे. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष एनडीए आणि इंडिया आघाडीतही नाही. ते कुणाला साथ देणार, हे याबाबत अद्याप संभ्रम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT