rahul gandhi | narendra modi.jpg sarkarnama
देश

Om Birla : गांधी कुटुंबियांचा निकटवर्तीय ठेवणार मोदी सरकारच्या खर्चावर लक्ष, ओम बिर्लांनी केली नियुक्ती

Om Birla on named the constituents of six new parliamentary committees : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकलेखा समितीसह सार्वजनिक लेखा, सार्वजनिक उपक्रम आणि अंदाज समित्यांचीही घोषणा केली.

Akshay Sabale

संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते, खासदार के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी के. सी. वेणुगोपाल यांची ही नियुक्ती केली आहे. लोकलेखा समितीवर सरकारच्या खर्चावर बारईकानं लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी लोकलेखा समितीसह सार्वजनिक लेखा, सार्वजनिक उपक्रम आणि अंदाज समित्यांचीही घोषणा केली. सरकारी लेख्यांसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समित्यांवर असते.

त्यातच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभा समितीच्या अध्यक्ष के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती केली आहे. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील लोकलेखा समितीचा कार्यकाळ 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. के. सी. वेणुगोपाल हे गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तीय व्यक्तींमधील एक आहेत. त्यासह ते काँग्रेसचे ( Congress ) सरचिटणीस आहेत.

दरम्यान, इतर मागासवर्गीय कल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजप नेते गणेश सिंह तर अनुसूचित जाती-जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचेच फगणसिंह कुलस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंदाज समितीची जबाबदारी भाजपचे संजय जयस्वाल यांच्यावर तर सार्वजनिक उपक्रमांच्या समितीची जबाबदारी वैजयंत पांडा यांच्यावर असेल.

सर्व समित्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असून समितीत लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सदस्यांचा समावेश असतो. बहुतांश वेळा या समित्यांवर अध्यक्ष किंवा सदस्यांची निवड केली जात असताना मतदान घेतले जाते. पण, यंदा सर्वच समित्यांवरील नियुक्त्या सर्वानुमते सदस्यांची निवड करून करण्यात आल्या आहेत. तर, विविध मंत्रालयाच्या आणि विभागांच्या कामकाजावर देखरेख करणाऱ्या स्थायी समित्यांची अद्याप निवड करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT