Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अडचणी वाढणार, गुन्हा दाखल करण्यास राज्यपालांची परवानगी

Siddaramaiah land scam cas : सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक करून महागड्या जागा मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Siddaramaiah News :कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. जमीन घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिली आहे. सिद्धरामय्या यांच्यावर म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमयूडीए) जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे.

जमीन घोटाळ्यावर नोटीस राज्यपालांनी नोटीस बजावून सिद्धरामय्या 26 जुलैला सात दिवसांत उत्तर मागितले होते. मात्र, कर्नाटक सरकारने राज्यपाल त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहे. त्यांनी नोटीस मागे घ्यावी म्हणून सल्ला दिला होता.

एमयूडीए घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी, मेहुणा आणि काही अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे फसवणूक करून महागड्या जागा मिळवल्याचा आरोप केला होता.

 Siddaramaiah
Vijay Wadettiwar : रामगिरी कसला संत? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार संतापले

नेमकं प्रकरण काय?

1992 मध्ये म्हैसूर नागरी विकास प्राधिकरणाने (एमयूडीए) शेतकऱ्यांकडून काही जमीन निवासी क्षेत्रात विकसित करण्यासाठी घेतल्या होत्या. त्या बदल्यात ज्यांची जमीन दिली. त्यांनी विकसित जमिनीतील 50 टक्के जागा किंवा पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला होता. पुढे या जमिनीतील शेतजमीन वेगळी करून शेतकऱ्यांना परत केली. सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्या भावाने 2004 मध्ये तीन एकर जमीन खरेदी केली होती.

सिद्धरामय्या यांचे कुटुंब या जमिनीची मालकी घेण्यासाठी गेले असता तेथील ती जमीन आधीच विकसित झाल्याचे आढळून आले. त्यामुळे भरपाई म्हणून सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांना म्हैसूरच्या एका महागड्या भागात जमीन देण्यात आली . पार्वती यांना दिलेल्या जमिनीची किंमत एमयूडीएने घेतलेल्या जमिनीपेक्षा जास्त असल्याचा आरोप होत आहे. सिद्धरामय्या हे उपमुख्यमंत्री तसेच सरकारमध्ये असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

 Siddaramaiah
Kolhapur Politics : आजी-माजी जिल्हाध्यक्षांचा पक्षांला ठेंगा; उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी निश्चित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com