One Nation One Election BJP Sarkarnama
देश

Lok Sabha Winter Session : भाजपची ‘त्या’ खासदारांवर कारवाई? ‘एक देश एक निवडणूक’वर मतदानामुळे भांडाफोड

One Nation One Election Bill BJP MP Parliament : लोकसभेत मंगळवारी केंद्रीय कायदामंत्री अर्जून राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक विधेयक सादर केले.

Rajanand More

New Delhi : लोकसभेत मंगळवारी एक देश एक निवडणूक हे मोदी सरकारचे महत्वाकांक्षी विधेयक सादर करण्यात आले. त्यासाठी भाजपने सर्व खासदारांना लोकसभेत यावेळी उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला होता. पण पक्षाचे जवळपास 20 खासदारांनी यावेळी दांडी मारल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हे विधेयक या आठवड्यात लोकसभेत सादर केले जाणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार भाजपने सोमवारी सर्व खासदारांना मंगळवारी लोकसभेत हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला होता.

केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी दुपारी हे विधेयक लोकसभेत सादर केले. ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक घटनाविरोधी असल्याची जोरदार टीका करत विरोधकांनी हे विधेयक मागे घेण्याची जोरदार मागणी केली. विरोधकांचा तीव्र विरोध पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यावर मतदान घेतले.

मतदानामध्ये विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते पडली. बहुमत प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे ओम बिर्ला यांनी जाहीर केले. पण त्यावरून आता भाजपने अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

लोकसभेत भाजपचे 240 खासदार असून इतर पक्षांच्या मदतीने सरकारला समर्थन असलेल्या आमदारांचा आकडा 290 हून अधिक आहे. पण प्रत्यक्षात मतदानावेळी विधेयकाच्या बाजूने केवळ 269 मते पडली. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला 272 चा आकडाही गाठता आला नाही. भाजपचे जवळपास 20 सदस्य यावेळी गैरहजर होते. त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT