One Nation One Election : विधेयक सादर करण्याआधीच मोदींनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता मोठा प्रस्ताव; शहांनीच सगळं सांगितलं...

One Nation One Election Bill Introduced in Lok Sabha : केंद्रीय कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी मंगळवारी एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर केले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक अखेर मंगळवारी लोकसभेत सादर करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे त्याला ‘इंडिया आघाडी’कडून कडाडून विरोध करण्यात आला. हे विधेयक घटनाविरोधी असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच काही सदस्यांनी विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली.

केंद्रीय कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत सादर केले. त्यावर चर्चेदरम्यान ‘जेपीसी’चा मुद्दा उपस्थित होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. शाह म्हणाले, विधेयक जेपीसीकडे पाठवायला हवे, असे सदस्य बालू यांनी म्हटले आहे.

Narendra Modi
Vishal Patil : येरे येरे पावसा, तुला देतो पैसा..! विशाल पाटलांची लोकसभेत बॅटिंग

‘विधेयक मत्रिमंडळात चर्चेला आले तेव्हा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इच्छा व्यक्त केली होती की, ‘हे विधेयक जेपीसीकडे पाठवायला हवे. सर्व स्तरांवर विस्तृत चर्चा व्हायला हवी.’ मला वाटते, यावर जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा मंत्र्यांना वाटत असेल तरी हे विधेयक जेपीसीकडे पाठवायला ते तयार आहेत, तर जेपीसीवर सर्व चर्चा होईल. जेपीसीच्या रिपोर्टच्या आधारावर मंत्रिमंडळ ते पारित करेल, त्यानंतरही त्यावर पुन्हा चर्चा होईल. मंत्र्यांची जेपीसीकडे पाठवण्याची इच्छा असेल तर इथेच ही गोष्ट संपून जाईल, असे शाह म्हणाले.

शाह यांच्या निवेदनानंतर मंत्री मेघवाल यांनी निश्चितपणे यावर जेपीसी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल. तशी सरकारची इच्छा असल्याचेही मेघवाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिंडळाने विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर आज ते लोकसभेत सादर करण्यात आले.

Narendra Modi
India Vs Pakistan : पाकिस्तानवरील विजयाचा ‘तो’ ऐतिहासिक फोटो मोदी सरकारने हटवला! लोकसभेत पडसाद

दरम्यान, विरोधकांनी हे विधेयक लोकसभेत सादर करण्यासच जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे त्यावर सध्या लोकसभेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. नवीन संसद भवनात पहिल्यांदाच मतदान होत असल्याने काही तांत्रिक अडथळे आले. त्यामुळे काही खासदारांकडून चिठ्ठीवर मतदान घेण्यात आले. सरकारच्या बाजून कौल आल्यास या विधेयकाचा संसदेतील पुढचा मार्ग मोकळा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com