Narendra Modi and Jagdeep Dhankhar Sarkarnama
देश

Parliament Winter Session: 'मी 20 वर्षांपासून अपमान सहन करतोय; पंतप्रधान मोदींचा जगदीप धनखडांना फोन

Ganesh Thombare

Delhi News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेतील घुसखोरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. विरोधकांनी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे मंगळवारी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले. तर त्याआधी सोमवारी 92 खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित केले गेले. त्यामुळे दोन दिवसांत तब्बल 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

या निलंबनाच्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना फोन करत मंगळवारी संसदेच्या बाहेर खासदारांनी केलेल्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निलंबनाची कारवाई केलेल्या एका खासदाराने संसदेच्या आवारात जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया देत 'भारताच्या उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक कार्यालयात आणि तेही संसदेत असा प्रकार घडणं हे दुर्दैवी', असल्याचे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 'मी वीस वर्षांपासून असा अपमान सहन करत आहे. काही लोकांच्या अशा कृत्याने मला माझे कर्तव्य पार पाडण्यापासून कोणी रोखू शकत नाही', असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तर 'कोणताही अपमान मला माझ्या कामाचा मार्ग बदलण्यास प्रवृत्त करू शकत नाही', अशी भावना जगदीप धनखड यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली. दरम्यान, खासदार कल्याण बनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीची पंतप्रधानांनी गंभीर दखल घेतली आहे.

कल्याण बॅनर्जी मिमिक्री करताना दिसले...

मंगळवारी सकाळी संसद परिसरात निलंबित खासदारांनी एकत्रित येत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी हे जगदीप धनखड यांची मिमिक्री करताना दिसले. तर बॅनर्जी मिमिक्री करत असताना राहुल गांधी त्यांचा व्हिडिओ शूट करत होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कल्याण बॅनर्जींवर गुन्हा दाखल

जगदीप धनखड यांची नक्कल करणे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना भोवले आहे. त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच निलंबन झालेल्या बॅनर्जींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT