eknath shinde | ajit pawar sarkaranama
देश

NDA Meeting Modi 3.0 : एकनाथ शिंदे अन् अजितदादांनी संसद भवनात पहिल्यांदाच ठोकलं भाषण; नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar And Eknath Shinde : संसदीय पक्षनेते पदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. याला 'एनडीए'तील घटकपक्षांनी पाठिंबा दिला आहे.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत जनतेनं बहुमताचा कौल 'एनडीए'च्या पारड्यात टाकला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. येत्या रविवारी 9 जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा राजधानी दिल्लीत पार पडेल.

त्यापूर्वी 'एनडीए'च्या संसदीय दलाची बैठक आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी राजनाथ सिंह यांनी संसदीय पक्ष नेतेपदाच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. याला अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, अजित पवार, एकनाथ शिंदे, चिराग पासवान यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची निवड झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेना मुख्यनेते म्हणून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण केलं आहे. अजित पवार 1991 साली लोकसभेत निवडून गेले होते. पण, शरद पवार यांच्यासाठी अजित पवारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

एकनाथ शिंदे भाषणात काय म्हणाले?

"आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मी माझा पक्ष शिवसेनेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी या देशाचा विकास केला, देशाला पुढं नेले. जगात देशाचं नाव चमकावलं आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करून नवीन ओळख मिळून दिली. म्हणूनच खोटे पसरविणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना देशातील जनतेनं नाकारलं आणि मोदींना तिसऱ्यांदा स्वीकारलं आहे," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

"मी शिवसेनेबद्दल एवढंच सांगेन की, भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात आमची युती झाली होती. त्यामुळे हा फेविकॉलचा जोड कधीच तुटणार नाही. लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रचंड मेहनत केली. यामुळे देशानं सलग तिसऱ्यांदा त्यांची जादू पाहिली आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"मी समर्थन करतो"

यानंतर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाषण करताना नवनियुक्त खासदारांचं अभिनंदन केलं आहे. अजित पवार म्हणाले, "राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदींच्या संसदीय पक्षनेते पदाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी समर्थन करतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT