PM Narendra Modi : मोदींनी खासदारांसमोर सांगितला ‘एनडीए’चा नवा अर्थ

Modi government NDA Meeting PM Narendra Modi : एनडीए संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी एनडीएचं कौतुक करताना विरोधकांवरही टीकास्त्र सोडलं.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नवीन खासदारांसमोरच 'एनडीए' शब्दाचा नवा अर्थ सांगितला. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजे एनडीए. पण मोदींनी एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया, अ‍ॅस्पिरेशनल इंडिया असे नामकरण केले.

मोदींनी हा अर्थ सांगतानाच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे रोडमॅप असल्याचेही स्पष्ट केले. पुढील काळात विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एनडीएचे सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, असे मोदींनी सांगितले.

काँग्रेसवर टीका

दहा वर्षानंतरही काँग्रेस शंभरचा आकडा गाठू शकली नाही. 2014, 2019 आणि 2014 या तीनही निवडणुकीत त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या, तेवढ्या जागा यावेळी एकट्या भाजपला मिळाल्या आहेत, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

चार तारखेनंतर मी आशा करत होतो की, विरोधक लोकशाहीचा सन्मान करतील. पण त्यांच्या वागणुकीवरून असे दिसते की, त्यांच्यामध्ये हे संस्कार येण्यास आणखी काही वेळ लागेल. हे लोक त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांचा अपमान करतात. त्यांचे निर्णय फाडतात, अशी टीका मोदींनी केली.

PM Narendra Modi
Narendra Modi : ईव्हीएम जिवंत आहे का? मेलं, मोदींचा विरोधकांना टोला 

लोकशाही आपल्याला सर्वांचा सन्मान करायला शिकवते. पराभूत झालेल्यांबद्दल मनात सुडाची भावना नाही. राष्ट्रहिताच्या भावनेने ते संसदेत येतील, अशी आशा आहे. देशाला आज केवळ एनडीएवर भरवसा असल्याचे बहुमत दाखवते. त्यामुळे देशाच्या अपेक्षाही तेवढ्याच आहेत. आपल्याला अधिक वेगाने देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी थोडाही विलंब करायचा नाही, असे मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com