Nitish Kumar Sarkarnama
देश

Loksabha Election: काँग्रेस, भाजप विधानसभा निवडणुकीत व्यस्त; आरक्षणावरून लोकसभेसाठी नितीश कुमारांची आघाडी

Loksabha Election Bihar CM Nitish Kumar Lead : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी बिहारमधील आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बाजी मारली आहे.

Sachin Waghmare

Loksabha Election News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने चालवली आहे. त्यामध्ये पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, भाजप दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीतच व्यस्त आहेत, तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी बिहारमधील आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बाजी मारली आहे.

विधानसभा निवडणुकीतील प्रचारात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या पाच वर्षांसाठी नागरिकांना रेशनवरील धान्य देण्याचा निर्णयाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ओबीसीबहुल परिसरात जातीय जनगणनेची मागणी केली आहे, तर दुसरीकडे मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी, इबीसी) वर्गाला शैक्षणिक, सरकारी नोकरीत आरक्षण देण्यासाठी कोटा वाढविला आहे. आरक्षण कोटा वाढविण्यासाठी त्यांनी विधानसभेत विधयेक संमत करीत काँग्रेस व भाजपच्या तुलनेत त्यांनी आघाडी घेतली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेत काहीसी आघाडी घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ते सामाजिक व न्याय विभागाचे चॅम्पियन म्हणून पुढे येत आहेत.

दुसरीकडे हा निर्णय घेताना नितीश कुमार यांनी त्यांचा बिहारमधील सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला कधीच मागे टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना व इंडिया आघाडीलादेखील निवडणुकीत फायदा होणार आहे.

इंडिया आघाडीतील घटक पक्षांना मिळाला नवा अजेंडा

इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी समता पार्टीच्या माध्यमातून आरक्षणाचा कोटा वाढवला आहे. त्यासोबतच येत्या काळात इंडिया आघाडीतील घटक पक्षांना त्यांनी नवा अजेंडा मिळवून दिला आहे. त्यामुळे येत्या काळात नितीश कुमार यांनी घेतलेला सुरक्षा कोटा वाढविण्याच्या निर्णयाला मतदारातून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT