Loksabha Election BJP Masterplan Sarkarnama
देश

Loksabha Election : भाजपच्या गोटात काय शिजतेय? दिल्लीत बैठकांवर बैठकांचा धडाका

Sachin Waghmare

Delhi News : लोकसभेच्या सेमी फायनलमध्ये विजयी झाल्याने भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने यश संपादन केल्यामुळे भाजपमध्ये चैतन्य पसरले असतानाच आता भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच भाजपने मिशन-२०२४ ची तयारी सुरू केली आहे.

भाजपच्या दिल्ली मुख्यालयात आज भाजपच्या बैठका सुरू आहेत तसेच उद्या (२३ डिसेंबर) बैठकांची धडाका सुरूच राहणार आहे. ज्यामध्ये सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस, राष्ट्रीय अधिकारी आणि देशभरातील सर्व मोर्चांचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. यामध्ये आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (jp nadda) यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका सुरू आहेत. यात सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस, राष्ट्रीय अधिकारी आणि देशभरातील सर्व मोर्चांचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात तसेच आघाडीच्या कामांबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीचा आढावादेखील या बैठकीत घेतला जाणार आहे.

महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा

या दोन दिवसीय बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये विविध राज्यातील पक्षाच्या कामगिरीचा व निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असून त्यानुसार प्रत्येक राज्यांत उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वजनदार मंत्री, आमदार लोकसभेच्या रिंगणात?

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकात काही खासदारांना उतरविण्याची रणनीती भाजपने आखली होती. त्याचा फायदा झाल्याने लोकसभेच्या निवडणूक रिंगणात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत मंत्रिमंडळातील काही वजनदार मंत्र्यांना आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची चाचपणी केली जात आहे. त्यांच्या प्रभावाच्या जोरावर लोकसभा निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असणार असल्याचे समजते.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT