Bjp News : भाजपचं ठरलं ! राज्यातून लोकसभेसाठी 'यांना' उतरविणार रिंगणात

Political News : भाजपकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.
Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde Sarkarnama
Published on
Updated on

loksabha Election : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सेमी फायनलमध्ये विजयी झाल्याने भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यामुळे भाजपमध्ये चैतन्य पसरले असतानाच आता भाजपकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती ठरवली आहे. लोकसभेच्या निवडणूक रिंगणात राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना व काही आमदारांना लोकसभेची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरावून त्यांच्या कामाच्या प्रभावावर लोकसभा निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Assembly Election : काँग्रेसने काय काय गमावले?

भाजपसोबतच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे काही मंत्री व आमदार, अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ही मंत्री व आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. या वजनदार मंत्र्यांच्या विश्वासावर लोकसभा निवडणूक जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच भाजपकडून याबाबतच्या बैठकीचा सिलसिला सुरु होता. याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत अशास्वरुपाची रणनीती भाजपकडून आखण्यात आली असल्याचे समजते. त्यावर निवडणूक निकाल आल्यानंतर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा

आगामी काळात होणाऱ्या महायुतीच्या जागावाटपात भाजपचा (bjp ) वरचष्मा असणार आहे. हे आता सिद्ध झाले आहे. तीन राज्यातील निवडणुकीत भाजपने यश मिळवल्याने आता भाजपची बार्गेनींग पॉवर वाढली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपावेळी शिंदे गट व अजित पवार गटाला थोडीशी नमती भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही गटाची ताकद आता काहीशी कमी होणार आहे.

भाजपने तीन राज्यात मिळवलेल्या यशामुळे भाजपचे पारडे आता जड झाले असून त्यामुळे आता दोन्ही गटाला भाजपचे ऐकावेच लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Maharashtra BJP News : शिंदेंची सेना, अजितदादांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मोदींचाच आधार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com