देश

Visa of Pakistan Hindus : मोठी बातमी ! भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदूंना दिलासा, दिर्घकालीन व्हिसा वैधच...

Long Term Visas for Hindu Pakistani Nationals Remain Valid : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध भारतीय व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द केले जाणार आहेत.

Ganesh Sonawane

Pakistani Hindus visa : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध भारतीय व्हिसा २७ एप्रिलपर्यंतच वैध असतील. त्यानंतर ते रद्द मानले जातील. पण, भारत सरकारचा हा नियम ज्या पाकिस्तानी हिंदूंना दिर्घकालीन भारतीय व्हिसा देण्यात आला आहे, त्यांना लागू होणार नाही. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने २४ एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयात उल्लेख केलेल्या व्हिसा रद्द करण्याच्या प्रक्रियेत हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच दिलेले दीर्घकालीन व्हिसा येत नाहीत. ते वैधच राहतील. असे म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकासह एकूण २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा तत्काळ स्थगित केल्या आहेत. या निर्णयानुसार, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत. मात्र, वैद्यकीय कारणांसाठी दिलेले व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहतील.

सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या अद्ययावत व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवास न करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला असून, सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्यांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीमेपार दहशतवादाला पाकिस्तानकडून मिळणारा पाठिंबा कायम असल्याने भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. १९६० च्या सिंधू पाणी कराराला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांना एक आठवड्याच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, SAARC व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात आले असून संबंधित पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारतातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे.

हे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा कॅबिनेट समितीच्या बैठकीत घेण्यात आले, ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT