Pakistani Citizens in Jalgaon : धक्कादायक ! जळगावात आढळले ३२७ पाकिस्तानी, एकाकडेही सार्क व्हिसा नाही

Kashmir Pahalgam terror attack, 327 Pakistani Citizens Found in Jalgaon : जळगाव शहरासह जिल्ह्यात ३२७ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य आढळून आले आहे. ३२७ पैकी १२ लोकांनी व्हिसा वाढवून मिळण्याची मागणी केल्याची माहिती मिळत आहे.
327 Pakistani Citizens Found in Jalgaon
327 Pakistani Citizens Found in Jalgaonsarkarnama
Published on
Updated on

Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मिरमील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्यात पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तान नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्रातील जळगाव शहरासह जिल्ह्यात ३२७ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य आढळून आले आहे. जळगावात वास्तव्यास असलेल्या ३२७ पैकी १२ लोकांनी व्हिसा वाढवून मिळण्याची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या लोकांविरोधात शासनाकडून जसे आदेश येतील त्यापद्धतीने पावले उचलण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

327 Pakistani Citizens Found in Jalgaon
Mohan Bhagwat : आता भारताची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे...; दहशतवादी हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. ३२७ पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणाकडेही सार्क व्हिसा नाही. हे नागरिक जळगावमध्ये टुरिस्ट व्हिसावर आले आहेत. त्या सगळ्या लोकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. यातील १२ लोकांनी टुरिस्ट व्हिसाच्या मुदत वाढीसाठी अर्ज केला आहे. सरकाकरडून निर्देश येतील त्यानुसार कारवाई करु अशी माहिती नखाते यांनी दिली आहे.

पाकिस्तानातून येऊन भारतात कामधंदे करुन भारतातून आर्थिक मदत पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. शहरात संपूर्ण उपनगराइतक्या लोकसंख्येत ही मंडळी मिसळून असल्याने सहजासजी कुणाला मिळून येत नाहीत. जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश भोळे ही गंभीर बाब असून असे लोक जळगावमध्ये सुद्धा घातपात घडवू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे. जळगावमध्ये फिरण्यासाठी पाकिस्तानी नागरिक आले मात्र व्हिजाची मुदत संपूनही परतले नसून जळगावतच वास्तव्य करत असल्याची माहिती आहे.

पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेत पाकिस्तानविरोधात कडक धोरण अवलंबिले आहे. पाकिस्तानातून भारतात सार्क व्हिजा, टुरिस्ट व्हिजा घेऊन आलेल्या नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचे आदेश मोदी सरकारने दिले आहेत. यानंतर जळगाव पोलिस यंत्रणा अॅक्टीव्ह मोडवर आली असून सक्रीय जळगावात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

327 Pakistani Citizens Found in Jalgaon
Medha Patkar Arrest : मोठी बातमी : मेधा पाटकर यांना अटक, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झटका

नाशिकमध्ये सहा पाकिस्तानी महिला वास्तव्यास

नाशिक शहरात सहा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून त्यांनाही भारत सोडण्यासाठी पोलिसांकडून नोटीस बजावली जाणार आहे. विशेष म्हणजे या सहा च्या सहा महिला आहेत. मागील काही दिवसांपासून त्या अधिकृतरित्या वास्तव्यास आहेत. भारताने ४८ तासांची मुदत दिल्यामुळे या महिलांनाही तत्काळ पाकिस्तानमध्ये परतावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com