Mamata Banerjee  Sarkarnama
देश

मतदान संपताच ममतांनी माजी मुख्यमंत्र्यांना दाखवला घरचा रस्ता...

Mamata Banerjee | luizinho faleiro | फालेरोंची राष्ट्रीय राजकारणातून गच्छंती

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यातील मतदान होवून अवघे दोन दिवसच उलटले आहेत. मात्र अवघ्या दोनच दिवसात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गोव्यातील निवडणुकीत फारसा प्रभाव न दाखवू शकल्यामुळे तृणमुल काँग्रेसच्या बॅड बुकमध्ये गेलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो (luizinho faleiro) यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून गच्छंती करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालामधील होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पक्षाची संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीच बरखास्त केली असून त्याजागी २० सदस्यांची पर्यायी गाभा समिती नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंच या समितीवर ८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून या ८ सदस्यांमध्ये फालेरो यांच्या नावाचा समावेश नाही.

तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रवेश केल्यानंतर तात्काळ मोठ्या अपेक्षा ठेवत पक्षाची सारी सूत्रे फालेरो यांच्याकडे सोपविली होती. मात्र गोव्यातील निवडणुकीवर फालेरो आपला कुठलाही प्रभाव पाडू शकले नाहीत असा निष्कर्ष पक्षाच्या वरिष्ठ निरीक्षकांनी काढला. या उलट त्यांच्या स्वतःचा नावेली मतदारसंघातही ते प्रभावहीनच दिसले. या साऱ्या पार्श्वभूमीवर ही नवीन घटना घडली असून हा निर्णय म्हणजे फालेरो यांना राष्ट्रीय राजकारणातून दिलेला डच्चू असल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत.

तृणमुलने यापूर्वी फालेरो यांना गोवा विधानसभा मतदारसंघात फातोर्डा (Fatorda)या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी हा प्रस्तावही फेटाळून लावला होता. त्यामुळे आय पॅकचे प्रशांत किशोर यांच्यासह गोवा प्रभारी महुआ मोईत्रा हे त्यांच्यावर नाराज देखील झाले होते. तेव्हापासूनच त्यांच्या गच्छंतीची चर्चा सुरु होती. आता अखेरीस ही चर्चा खरी ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT